Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; चांदी २२६७ रुपयांनी महागली, सोन्याचा भावही वाढला

सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; चांदी २२६७ रुपयांनी महागली, सोन्याचा भावही वाढला

Gold Silver Price Today 23 Dec: आजही सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. पाहा काय आहे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:54 IST2024-12-23T15:54:49+5:302024-12-23T15:54:49+5:30

Gold Silver Price Today 23 Dec: आजही सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. पाहा काय आहे नवे दर.

Big change in gold and silver prices Silver became expensive by Rs 2267 gold price also increased | सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; चांदी २२६७ रुपयांनी महागली, सोन्याचा भावही वाढला

सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; चांदी २२६७ रुपयांनी महागली, सोन्याचा भावही वाढला

Gold Silver Price Today 23 Dec: आजही सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव सरासरी ७८७ रुपयांनी वाढून ७८,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरात आज २,२६७ रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव सरासरी ८७,४०० रुपयांवर खुला झाला. आयबीएनं हा दर जाहीर केला आहे, यामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

आज २३ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव ७८३ रुपयांनी वाढून ७५,८५८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७२१ रुपयांनी वाढून ६९,७६६ रुपये झालाय. १८ कॅरेट सोन्याचा भाव ७२१ रुपयांनी वाढून ५७,१२३ रुपये झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ५९० रुपयांनी वाढून ४४,५५६ रुपये झाला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालयं आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.

Web Title: Big change in gold and silver prices Silver became expensive by Rs 2267 gold price also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.