Fixed Deposit News : शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आजही बहुतांश मध्यमवर्गीय गुंतवणूकदार आपल्या कष्टाची कमाई मुदत ठेव योजनेत ठेवण्याला प्राधान्य देतात. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे आता अत्यंत आवश्यक झाले आहे. १ एप्रिल २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांच्या तुलनेत 'स्मॉल फायनान्स बँका' गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक परतावा देत असल्याचे दिसून येत आहे.
सर्वाधिक परताव्याचा 'तडका'
जर तुम्हाला गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याज हवे असेल, तर स्मॉल फायनान्स बँका आघाडीवर आहेत. १ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी हे दर खालीलप्रमाणे आहेत.
- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ८.१०% (सर्वाधिक)
- जना स्मॉल फायनान्स बँक : ८.००%
- ESAF स्मॉल फायनान्स बँक : ८.००%
- शिवालिक स्मॉल फायनान्स बँक : ७.८०%
- स्लाइस स्मॉल फायनान्स बँक : ७.७५%
मध्यम परतावा आणि विश्वासार्हता
खाजगी बँकांमध्ये आयडीएफसी फर्स्ट आणि एसबीएम बँक इतर मोठ्या बँकांच्या तुलनेत चांगले दर देत आहेत.
- IDFC FIRST Bank : ७.४०%
- SBM Bank India : ७.३०%
- बंधन बँक : ७.२५%
- RBL बँक : ७.२०%
- DCB बँक : ७.१५%
सुरक्षिततेचा 'भक्कम' आधार
सरकारी बँकांचे व्याजदर स्मॉल फायनान्स बँकांच्या तुलनेत कमी असले, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक ग्राहक आजही येथेच गुंतवणूक करतात.
- पंजाब अँड सिंध बँक : ६.७५%
- बँक ऑफ महाराष्ट्र : ६.६५%
- बँक ऑफ इंडिया / PNB : ६.६०%
- स्टेट बँक ऑफ इंडिया : ६.४५%
विदेशी बँका: मर्यादित व्याजदर
भारतात कार्यरत असलेल्या विदेशी बँकांमध्ये 'डॉयचे बँक' सर्वाधिक ७ टक्के व्याज देत आहे.
- डॉयचे बँक : ७.००%
- स्टँडर्ड चार्टर्ड बँक : ६.६०%
- HSBC बँक : ५.५०%
वाचा - घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला
व्याजदरातील १ टक्क्याचा फरकही दीर्घकाळासाठी तुमच्या एकूण नफ्यावर मोठा परिणाम करू शकतो. स्मॉल फायनान्स बँकांमध्ये गुंतवणूक करताना DICGC अंतर्गत मिळणाऱ्या ५ लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना या दरांच्या तुलनेत सहसा ०.५०% अधिक व्याज मिळते, याचीही नोंद घ्यावी.
