Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती

१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती

New Rule from 1 July 2024: १ जुलैपासून सरकारी आणि खासगी बँकांचे काही नियम बदलणार आहेत. पाहा काय होणार आहे तुमच्या खिशावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:13 IST2025-06-20T14:13:08+5:302025-06-20T14:13:08+5:30

New Rule from 1 July 2024: १ जुलैपासून सरकारी आणि खासगी बँकांचे काही नियम बदलणार आहेत. पाहा काय होणार आहे तुमच्या खिशावर परिणाम

Banking rules will change from July 1 2025 there will also be changes in credit card bill payments know the information | १ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती

१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती

New Rule from 1 July 2024: १ जुलैपासून सरकारी आणि खासगी बँकांचे काही नियम बदलणार आहेत. आयसीआयसीआय बँकेनं काही व्यवहारांवरील सेवा शुल्कात बदल केलाय. एचडीएफसी बँकेनंही आपल्या क्रेडिट कार्डशी संबंधित अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. तर इंडियन बँक आपल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या दरात बदल करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर १ जुलैपासून क्रेडिट कार्डच्या पेमेंट नियमांमध्येही बदल होणार आहे. याचा थेट परिणाम बँकेच्या ग्राहकांच्या खिशावर होणारे.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी क्रेडिट कार्डसह ड्रीम ११, एमपीएल, रम्मी कल्चर सारख्या गेमिंग अॅप्सवर दरमहा १०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास आता तुम्हाला १% अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. हे शुल्क महिन्याला ४,९९९ रुपयांपर्यंत मर्यादित असेल. यासह. या व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट मिळणार नाहीत. त्याचबरोबर थर्ड पार्टी वॉलेटमध्ये (जसे की पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज, ओला मनी) एका महिन्यात १०,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे लोड केल्यास ग्राहकांकडून १% शुल्क आकारलं जाईल. यामध्ये शुल्क मर्यादा महिन्याला ४,९९९ रुपयांपर्यंत असेल.

ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

Utility Bill वरही चार्ज

जर तुम्ही तुमच्या एचडीएफसी क्रेडिट कार्डद्वारे एका महिन्यात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी बिलं (वीज, पाणी, गॅस इत्यादी) भरत असाल तर आता तुम्हाला १% अतिरिक्त शुल्क भरावं लागेल. येथेही शुल्काची कमाल मर्यादा ४,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. इंधनासाठी १५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर एक टक्का शुल्क आकारण्यात येणार आहे.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

क्रेडिट कार्डच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेचे नवे नियम १ जुलैपासून लागू होणार आहेत. यामुळे क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. भारत बिल पेमेंट सिस्टीमद्वारे (बीबीपीएस) सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट रिवाईज करण्याच्या आवश्यकतेच्या आदेशाचा परिणाम फोनपे, क्रेड, बिलडेस्क आणि इन्फीबीम एव्हेन्यू सारख्या आघाडीच्या फिनटेक प्लॅटफॉर्मवर होणार आहे. आरबीआयनं निर्देश दिले आहेत की १ जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट बीबीपीएसद्वारे केले जावे. क्रेडिट कार्ड देण्यास अधिकृत असलेल्या ३४ बँकांपैकी आतापर्यंत केवळ आठ बँकांनी बीबीपीएसवर बिल पेमेंट सक्रिय केले आहे.

इंडियन बँक फिक्स्ड डिपॉझिट

इंडियन बँक ग्राहकांना खास एफडी स्कीम देत आहे. इंडियन बँक आपल्या ग्राहकांना ३०० आणि ४०० दिवसांची एफडी देत आहे. इंडियन बँक ३० जून २०२५ पर्यंत इंड सुपर ४०० आणि इंड सुप्रीम ३०० दिवसांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. ही एक खास एफडी कॉलेबल एफडी आहे. कॉलेबल एफडी म्हणजे तुम्हाला वेळेआधी पैसे काढण्याचा पर्याय मिळतो.

Web Title: Banking rules will change from July 1 2025 there will also be changes in credit card bill payments know the information