Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'

गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'

Bank of Baroda FD : मुदत ठेवींतून मिळणारे परतावे बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण देतात आणि मुलांचे शिक्षण, विवाह किंवा निवृत्ती यांसारख्या भविष्यातील नियोजनासाठी एक भक्कम पाया उपलब्ध करून देतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:10 IST2026-04-06T10:36:31+5:302026-04-06T11:10:10+5:30

Bank of Baroda FD : मुदत ठेवींतून मिळणारे परतावे बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण देतात आणि मुलांचे शिक्षण, विवाह किंवा निवृत्ती यांसारख्या भविष्यातील नियोजनासाठी एक भक्कम पाया उपलब्ध करून देतात.

Bank of Baroda FD Rates 2026: Returns on ₹5 Lakh Investment for 5 Years | गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'

गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'

Bank of Baroda FD : शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात आजही अनेक गुंतवणूकदार सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासाठी मुदत ठेव योजनेला पसंती देतात. जर तुम्ही सुरक्षिततेसोबतच चांगल्या परताव्याच्या शोधात असाल, तर 'बँक ऑफ बडोदा'ची ५ वर्षांची एफडी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अधिक लाभदायी आहे.

बँक ऑफ बडोदा: सध्याचे व्याजदर
बँकेने वेगवेगळ्या वयोगटातील ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदर निश्चित केले आहेत.
सामान्य नागरिक : ६.३०% प्रति वर्ष.
ज्येष्ठ नागरिक : ६.९०% प्रति वर्ष.
अति ज्येष्ठ नागरिक : ७.००% प्रति वर्ष.
(टीप: ३ वर्षांहून अधिक आणि ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी हे दर लागू आहेत.)

५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती मिळणार परतावा?
बँक ऑफ बडोदामध्ये व्याजाची गणना 'त्रैमासिक चक्रवाढ' पद्धतीने केली जाते. म्हणजेच दर ३ महिन्यांनी तुमच्या मुदलात व्याज जमा होते.
१. सामान्य नागरिक (व्याजदर ६.३०%):
गुंतवणूक : ५,००,००० रुपये
मिळालेले एकूण व्याज : १,८३,४५० रुपये
मॅच्युरिटी रक्कम : ६,८३,४५० रुपये

२. ज्येष्ठ नागरिक (व्याजदर ६.९०%)
मिळालेले एकूण व्याज : २,०३,९२१ रुपये
मॅच्युरिटी रक्कम : ७,०३,९२१ रुपये

३. अति ज्येष्ठ नागरिक (व्याजदर ७.००%):
मिळालेले एकूण व्याज : २,०७,३८९ रुपये
मॅच्युरिटी रक्कम : ७,०७,३८९ रुपये

वाचा - करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन

एफडी वरील व्याजावर 'कर' किती?

  • मुदत ठेवीतून मिळणारे उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त नसते. त्याबाबतचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
  • इन्कम टॅक्स स्लॅब: एफडीमधून मिळणारे व्याज तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते आणि तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर आकारला जातो.
  • ज्येष्ठ नागरिकांना सवलत: 'कलम 80TTB' अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवरील ५०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सवलत मिळते (जुनी कर रचना निवडल्यास).
  • कलम 80C: ५ वर्षांच्या टॅक्स सेव्हर एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट मिळते.

Web Title : बैंक ऑफ बड़ौदा एफडी: वरिष्ठ नागरिकों के लिए उच्च रिटर्न वाला निवेश।

Web Summary : बैंक ऑफ बड़ौदा की सावधि जमा योजना वरिष्ठ नागरिकों के लिए आकर्षक रिटर्न प्रदान करती है। ₹5 लाख के निवेश पर पांच वर्षों में ₹7 लाख तक मिल सकते हैं, वरिष्ठ और अति वरिष्ठ नागरिकों के लिए उच्च ब्याज दरें हैं। कर लाभ भी उपलब्ध हैं।

Web Title : Bank of Baroda FD: High returns for senior citizens on deposits.

Web Summary : Bank of Baroda's fixed deposit scheme offers attractive returns, especially for senior citizens. Investments of ₹5 lakhs can yield up to ₹7 lakhs in five years, with higher interest rates for senior and super senior citizens. Tax benefits are also available.