Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?

चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?

Bajaj EV production: येत्या काळात बजाज ऑटोला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवावे लागू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:08 IST2025-07-25T19:07:13+5:302025-07-25T19:08:56+5:30

Bajaj EV production: येत्या काळात बजाज ऑटोला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवावे लागू शकते.

Bajaj EV production: China's big blow to Bajaj; EV production may stop from August, why? | चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?

चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?

Bajaj EV production: देशातील प्रसिद्ध ऑटो कंपनी बजाज ऑटोला मोठा धक्का बसू शकतो. कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनी सांगितले की, परिस्थिती सुधारली नाही, तर कंपनीला ऑगस्ट २०२५ पासून त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन थांबवावे लागू शकते. याचे सर्वात मोठे कारण चीन आहे. चीनी सरकारने दुर्मिळ अर्थ मॅग्नेटच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हे मॅग्नेट इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी खूप महत्वाचा कच्चा माल आहे. 

दुर्मिळ अर्थ मॅग्नेटच्या कमतरतेमुळे उत्पादन थांबू शकते
बजाज सध्या त्यांचे चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आणि अलीकडेच लॉन्च झालेल्या गो ई-रिक्षाचे उत्पादन करत आहे. परंतु आता चीनमधून हे दुर्मिळ अर्थ मॅग्नेटचा पुरवठा थांबत आहे, ज्यामुळे ईव्ही मोटर्स बनवण्यासाठी अडचणी येऊ शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, जर सध्याचा साठा लवकरच संपला आणि पर्यायी पुरवठा झाला नाही, तर ऑगस्ट २०२५ कंपनीसाठी 'शून्य उत्पादन महिना' ठरू शकतो. 

सरकारकडे मदत मागितली
राजीव बजाज यांनी या कठीण परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) मध्ये वापरल्या जाणाऱ्या सुमारे ९०% मॅग्नेट चीनमधून येतात. चीनच्या नवीन निर्यात धोरणामुळे केवळ बजाजच नाही, तर इतर अनेक भारतीय ऑटो कंपन्यांच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. राजीव बजाज यांनी भारत सरकारला या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, सरकारने धोरणात स्थिरता आणि स्पष्ट दिशा द्यावी, जेणेकरून कंपन्या देशातच नवीन पुरवठादार शोधू शकतील.

टीव्हीएस आणि एथरदेखील प्रभावित 
बजाजप्रमाणेच, टीव्हीएस आणि एथर एनर्जी सारख्या इतर इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनाही याच समस्येचा सामना करावा लागत आहे. पुरवठ्याच्या समस्यांमुळे या कंपन्या हळूहळू त्यांचे उत्पादन कमी करत आहेत. लवकरच उपाय शोधला गेला नाही, तर येणाऱ्या काळात ग्राहकांना त्याचा थेट परिणाम दिसून येईल. यामुळे ईव्हीची उपलब्धता कमी होईलच, परंतु त्यांच्या किमतीही वाढू शकतात.

रेअर अर्थ मॅग्नेटचे महत्त्व काय आहे?
रेअर अर्थ मॅग्नेट हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) खूप महत्वाचे भाग आहेत. ते विशेषतः मोटर चालविण्यासाठी वापरले जातात. हे मॅग्नेट फार कमी देशांमध्ये तयार केले जातात. सध्या, चीन हा या मॅग्नेटचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. जेव्हा चीन त्यांच्या निर्यातीवर बंदी घालतो तेव्हा त्याचा थेट परिणाम जगभरातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांवर होतो.

संधी गमावू नका; या स्पोर्ट्स बाईक्सवर मिळतोय १ लाख रुपयांचा डिस्काउंट, जाणून घ्या किंमत...

Web Title: Bajaj EV production: China's big blow to Bajaj; EV production may stop from August, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.