Azad Engineering Share Price: स्मॉलकॅप कंपनी आझाद इंजिनिअरिंगच्या (Azad Engineering) शेअर्समध्ये आज सोमवारी चांगली वाढ दिसून आली. आझाद इंजिनिअरिंगचे शेअर सोमवारी ४ टक्क्यांहून अधिक वाढून १६२४.४५ रुपयांवर पोहोचले. हेवी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट उद्योगाशी संबंधित असलेल्या या कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांनी जपानच्या मित्सुबिशी हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (Mitsubishi Heavy Electrical Limited) सोबत एक नवीन दीर्घकालीन करार (Long-Term Contract) आणि प्राईसिंग ॲग्रीमेंट केला आहे. या कराराचे मूल्य ७३.४७ मिलियन डॉलर (म्हणजे ६५१ कोटी रुपये) इतके आहे. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आझाद इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक केली होती.
मित्सुबिशीसोबत झालेल्या कराराचे तपशील
या करारानुसार, आझाद इंजिनिअरिंग कॉम्प्लेक्स रोटेटिंग आणि स्टेशनरी एअरफॉईल्सची सप्लाय करेल, ज्याचा वापर ॲडव्हान्स्ड गॅस आणि थर्मल पॉवर टर्बाइन इंजिन्समध्ये केला जाईल. हा करार मित्सुबिशी हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या ग्लोबल पॉवर जनरेशन व्यवसायाला सपोर्ट करेल. आझाद इंजिनिअरिंगने यापूर्वीही ३ नोव्हेंबर २०२४ रोजी मित्सुबिशी हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडसोबत करार केला होता. ताज्या करारानंतर दोन्ही कंपन्यांमधील व्यवसायाचं एकूण मूल्य १३८७ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. हा नवीन करार ५ वर्षांच्या कालावधीत पूर्ण करायचा आहे. आझाद इंजिनिअरिंगने स्पष्ट केलं की, मित्सुबिशी हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये त्यांचा कोणताही हिस्सा नाही आणि हा रिलेटेड पार्टी डील (Related Party Deal) नाही.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील आझाद इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक केली होती. तेंडुलकरने मार्च २०२३ मध्ये कंपनीत ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यांना ३४२५ रुपये प्रति शेअर दराने शेअरचे वाटप करण्यात आले. शेअर्सच्या वाटप आणि बोनस शेअर्सनंतर, सचिन तेंडुलकरला आझाद इंजिनिअरिंगचा एक शेअर ११४.४० रुपयांचा मिळाला. सचिन तेंडुलकर यांच्याकडे आझाद इंजिनिअरिंगचे ४,३८,२१० शेअर्स होते. २८ डिसेंबर २०२३ रोजी आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्सची लिस्टिंग झाल्यानंतर तेंडुलकरच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून ३१.५५ कोटी रुपयांवर पोहोचलं. स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे जून २०२४ मध्ये तेंडुलकरच्या गुंतवणुकीचे मूल्य ७२ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. सचिन तेंडुलकरनं आझाद इंजिनिअरिंगमधील आपली गुंतवणूक कायम ठेवली आहे की, तो कंपनीतून बाहेर पडलाय, याची माहिती सध्या उपलब्ध नाही.
IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत
आझाद इंजिनिअरिंगचा IPO बोली लावण्यासाठी २० डिसेंबर २०२३ रोजी खुला झाला होता आणि तो २२ डिसेंबरपर्यंत ओपन होता. IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५२४ रुपये होती. आझाद इंजिनिअरिंगचे शेअर २८ डिसेंबर २०२३ रोजी ७१० रुपयांवर बाजारात लिस्ट झाले होते. कंपनीचा IPO एकूण ८३.०४ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या IPO मध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा कोटा २४.५१ पट सबस्क्राइब झाला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)