Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार

ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार

देशातील एटीएमच्या संख्या कमी झाल्या असून बँकांच्या शाखांची संख्या मात्र वाढली आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:37 IST2025-12-30T10:37:11+5:302025-12-30T10:37:11+5:30

देशातील एटीएमच्या संख्या कमी झाल्या असून बँकांच्या शाखांची संख्या मात्र वाढली आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण.

ATMs have decreased bank branches have increased huge increase in savings accounts deposits have crossed Rs 3 3 lakh crore | ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार

ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एका अहवालानुसार, देशातील एटीएमच्या (ATM) संख्येत घट झाली आहे, कारण लोक मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंटकडे वळत आहेत. ई-पेमेंट नेटवर्कमुळे ग्राहकांची रोख रक्कम काढण्याची गरज कमी झाली आहे, असं असलं तरी बँकांच्या शाखांचा विस्तार सुरूच आहे. आरबीआयनं एटीएम संख्या कमी होण्याचं मुख्य कारण वाढतं डिजिटल पेमेंट असल्याचं सांगितलंय. ज्यामुळे ग्राहकांची एटीएमद्वारे व्यवहार करण्याची आवश्यकता कमी झाली आहे.

खाजगी आणि सार्वजनिक बँकांच्या एटीएममध्ये कपात

अहवालानुसार, खाजगी बँकांनी त्यांचे एटीएम नेटवर्क ७९,८८४ वरून कमी करून ७७,११७ केले आहे. दुसरीकडे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी प्रामुख्यानं 'ऑफसाइट' मशीन बंद करून आपल्या एटीएमची संख्या १३४,६९४ वरून १३३,५४४ पर्यंत खाली आणली आहे. याउलट, व्हाईट लेबल एटीएम (नॉन-बँकिंग संस्थांद्वारे स्थापित) ऑपरेटरनी आपली उपस्थिती वाढवली असून त्यांची संख्या ३४,६०२ वरून ३६,२१६ झाली आहे.

मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्रामीण, निमशहरी, शहरी आणि महानगरीय भागात आपले एटीएम संतुलित ठेवले असले तरी, खाजगी आणि विदेशी बँकांचे एटीएम अजूनही मुख्यत्वे शहरी आणि महानगरांमध्येच केंद्रित आहेत.

बँक शाखांचा विस्तार आणि ग्रामीण भागातील प्रगती

एटीएम कमी होत असतानाच, बँक शाखांची संख्या मात्र २.८ टक्क्यांनी वाढून सुमारे १,६४,००० झाली आहे. यामध्ये सार्वजनिक बँकांचा वाटा मोठा आहे. सार्वजनिक बँकांनी उघडलेल्या नवीन शाखांपैकी दोन तृतीयांश पेक्षा जास्त शाखा ग्रामीण आणि निमशहरी भागात आहेत. याउलट, खाजगी बँकांच्या केवळ ३७.५ टक्के नवीन शाखा या भागात उघडल्या गेल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात बँकिंग सेवांची पोहोच वाढण्यास मदत होत आहे.

बचत खाती आणि विमा व्याप्ती

बेसिक बचत बँक ठेव खात्यांमध्ये सातत्यानं वाढ होत असून ती २.६ टक्क्यांनी वाढून ७२.४ कोटी झाली आहेत. या खात्यांमधील जमा रक्कम ९.५ टक्क्यांनी वाढून ३.३ लाख कोटी रुपये झाली. यातील बहुतांश खाती 'बिझनेस करस्पॉन्डंट'च्या माध्यमातून चालवली जातात. ठेव विम्याच्या संदर्भात अहवालात असं म्हटलंय की, आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस ९७.६ टक्के खाती सध्याच्या ५ लाख रुपयांच्या विमा मर्यादेत होती. परंतु, विमा उतरवलेल्या ठेवींचं प्रमाण मागील वर्षाच्या ४३.१ टक्क्यांवरून किंचित घटून ४१.५ टक्के झालंय.

Web Title : एटीएम घटे, बैंक शाखाएँ बढ़ीं; बचत खातों में भारी वृद्धि।

Web Summary : डिजिटल भुगतान के कारण एटीएम कम हो रहे हैं, जबकि बैंक शाखाएँ, विशेषकर ग्रामीण क्षेत्रों में, बढ़ रही हैं। बचत खातों में भारी वृद्धि हुई है, जमा राशि ₹3.3 लाख करोड़ से अधिक है, जो ज्यादातर व्यावसायिक संवाददाताओं के माध्यम से प्रबंधित है। अधिकांश खाते जमा बीमा द्वारा कवर किए जाते हैं।

Web Title : ATM numbers decrease, bank branches increase; savings accounts surge.

Web Summary : ATMs are declining due to digital payments, while bank branches expand, especially in rural areas. Savings accounts have increased significantly, with deposits exceeding ₹3.3 lakh crore, largely managed via business correspondents. Most accounts are covered by deposit insurance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.