Atlanta Electricals Ltd Listing: अटलांटा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची शेअर बाजारात स्थिर सुरुवात झाली आहे. कंपनीचा IPO १३.६६ टक्क्यांच्या प्रीमियमसह ८५७ रुपयांच्या पातळीवर एनएसईवर लिस्ट झाला. त्याच वेळी, बीएसईवर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग ८५८.१० रुपयांवर झाली. कंपनीच्या शेअर्सचा प्राईस बँड ७१८ रुपये ते ७५४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.
लिस्टिंगनंतर अटलांटा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या शेअर्सनी वाढ नोंदवत ८६५ रुपयांची पातळी गाठली. तथापि, यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली, ज्यामुळे स्टॉकचा भाव घसरून ८०६.२५ रुपयांच्या इंट्रा-डे लो पातळीवर आला होता.
२२ सप्टेंबरला खुला झाला होता IPO
अटलांटा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा IPO २२ सप्टेंबरला खुला झाला होता. या IPO वर २४ सप्टेंबरपर्यंत बोली लावण्याची संधी गुंतवणूकदारांना होती. तर IPO साठी कंपनीनं १९ शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमीतकमी १४३२६ रुपयांची बोली लावावी लागली होती.
IPO ला मिळालं ७२ पट सबस्क्रिप्शन
कंपनीच्या IPO ला ३ दिवसांत ७२.१६ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. रिटेल कॅटेगरीत हा IPO सर्वाधिक १०.७६ पट सबस्क्राइब झाला होता. त्याच वेळी, क्यूआयबी (QIB) कॅटेगरीत कंपनीच्या IPO ला १९४.७७ पट सबस्क्रिप्शन मिळालं. एनआयआय (NII) कॅटेगरीत IPO ला ५५.८२ पट सबस्क्रिप्शन प्राप्त झाले होतं. अटलांटा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या IPO चा आकार ६८७.८५ कोटी रुपयांचा आहे. कंपनीनं IPO द्वारे ५३ लाख नवीन शेअर्स जारी केले आहेत. तसंच, ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे ३८ लाख शेअर्सची विक्री करण्यात आली. दरम्यान, अँकर गुंतवणूकदारांसाठी हा IPO १९ सप्टेंबरला खुला झाला होता, तेव्हा कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून २०४.७० कोटी रुपये जमवले होते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे, हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)