नवी दिल्ली : दररोज कोणत्या ना कोणत्या कंपनीतून नोकरकपातीच्या किंवा रोजगारसंधी कमी होण्याच्या बातम्या येत असताना येत्या काही वर्षात देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्रात मात्र हजारो रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. कारण, केंद्र सरकारने सेमीकंडक्टरच्या उत्पादनात भारताला जागतिक बाजारात अन्य देशांशी स्पर्धा करण्याएवढे सक्षम करण्याचा निर्धार केला आहे.
२०३० पर्यंत ८३ लाख कोटी रुपयांच्या जागतिक चिप बाजारपेठेत लक्षणीय वाटा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्याच्या घडीला सेमीकंडक्टर बाजारपेठ ३.१५ लाख कोटी रुपयांची असून २०३० पर्यंत ती ८.३ लाख कोटी रुपये ते ९.१३ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याची सरकारची इच्छा आहे.
कौशल्य विकास
८५,०००
विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन प्रशिक्षणाचे लक्ष्य
१००
सेमीकंडक्टर प्रोग्रॅम्स आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल
आयटीमध्ये सुरू
गुंतवणूकदार कंपन्या
मायक्रॉन टेक्नॉलॉजी-२२,५०० कोटींचा पॅकेजिंग प्लान्ट
टाटा इलेक्ट्रॉनिक्स- चिप फॅब प्लांटसाठी मोठी योजना
वेदांता-फॉक्सकॉन- १.५ लाख कोटींची प्रस्तावित गुंतवणूक
जागतिक सहकार्य
आयएमईसी (बेल्जियम), लेटी (फ्रान्स), टीएसएमसी (तैवान) यांच्यासोबत भागीदारीसाठी हालचाली
इंडिया ऍज ए ट्रस्टेड सप्लाय चेन पार्टनर मोहीम सुरू
गुंतवणूक व प्रोत्साहन
१.२५ लाख कोटी रु. खासगी क्षेत्रातून घोषित/ अपेक्षित गुंतवणूक
७६,००० कोटी रु. सेमीकॉन इंडिया अंतर्गत पॅकेज
कौशल्य विकास, संशोधनात भरीव काम !
इंडिया सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत सरकारने पायाभूत सुविधा, कौशल्यविकास, संशोधन आणि गुंतवणुकीमध्ये भरीव कामगिरी केली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतात सेमीकंडक्टर प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात लाखो कुशल तंत्रज्ञ तयार होणार असून तितक्याच रोजगारसंधीही उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, सेमीकंडक्टर मिशनच्या माध्यमातून केवळ उत्पादन क्रांती होणार नसून ती भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबनाची गुरुकिल्ली ठरणार आहे.