Health Insurance Claim: आरोग्य विमा काढल्यानंतर त्याचे पैसे मिळवण्यातही अनेकदा समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर यासाठी सहा ते ४८ तासांपर्यंत वाट पाहावी लागते. 'इकॉनॉमिक टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अनेक विमा कंपन्यांनी त्यांच्या पॉलिसीधारकांना उपचारांसाठी त्वरित मंजुरी दिली, परंतु पेमेंट करण्यासाठी जास्त वेळ लावला. यामुळे पॉलिसी घेणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
काही विमा कंपन्यांनी रुग्णांना उपचारांसाठी मंजुरी दिली, पण पेमेंट करताना हा आजार पॉलिसी घेण्यापूर्वीच होता असं सांगितलं. पॉलिसीधारकांनी आजार लपवला होता. परंतु, जेव्हा पॉलिसीधारकांनी पुरावे आणि डॉक्टरांचे रिपोर्ट सादर केले, तेव्हा विमा कंपन्यांना मवाळ भूमिका घ्यावी लागली. तरीही रुग्णांना एका-दोन दिवसांचं अतिरिक्त रुम रेंट भरावं लागलं.
जाणीवपूर्वक करत आहेत विलंब?
रुग्णांचा दावा नाकारण्यावर खूप चर्चा झाली आहे, पण डिस्चार्जला होणारा विलंब यांसारख्या इतर समस्यांमुळे रुग्णांचे कष्ट वाढतात. इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना एका विमा उद्योगातील जुन्या जाणकारान नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "रुग्णालय सांगतात की डिस्चार्ज समरी बनवायला वेळ लागतो, पण त्यांच्याकडे आधीच सर्व माहिती असते, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी असायला हवी."
डिस्चार्जमध्ये विलंब का होत आहे?
डिस्चार्ज समरी आणि बिल मिळाल्यानंतर अंतिम दावा मंजूर करण्यासाठी आयआरडीएची एक डेडलाईन आहे. बहुतेक डिस्चार्जमधील विलंब अॅडमिनिस्ट्रेशनशी संबंधित समस्या आणि नोकरशाहीमुळे होतो. काही विलंब वैद्यकीय कारणांमुळेही होतो. त्याचबरोबर असंही म्हटलं जात आहे की, उपचारांपूर्वी विमा कंपनीकडून एका निश्चित रकमेची मंजुरी मिळते, पण अंतिम बिलामध्ये ही रक्कम जास्त असते. विमा कंपनी, पॉलिसीधारक आणि रुग्णालय यांच्यातील समन्वयामध्ये जास्त वेळ लागतो. रुग्णालये आणि विमा कंपन्यांमधील समन्वयही खूप खराब मानला जात आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना काही अतिरिक्त दिवस रुग्णालयात घालवावे लागतात.
ज्यांचा विमा नाही, त्यांना रुग्णालयातून लवकर मिळते सुट्टी
रुग्णाला रुग्णालयातून लवकर सुट्टी मिळावी, यावर अनेक चर्चा झाल्या आहेत. जाणकारांचं म्हणणं आहे की, रुग्णालयानं डिस्चार्ज होण्यापूर्वीच सुट्टी दिली पाहिजे. अॅडमिनिस्ट्रेशनकडून होणारा विलंब कमी केला पाहिजे. नॅशनल हेल्थ अथॉरिटीनं तयार केलेल्या एनएचसीएक्सच्या प्लॅटफॉर्ममध्ये अधिकाधिक कंपन्यांनी सामील झालं पाहिजे. यामुळे दावा निकाली काढण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. तसंच विमा कंपन्यांचं असंही म्हणणं आहे की, याचं एक कारण हे आहे की अनेक रुग्णालये अजूनही "जुन्या आयटी प्रणालीवर" काम करतात जे कस्टमर फ्रेंडली नाहीत. अशा परिस्थितीत, विमा नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज होण्यास जवळपास ३.५ तास लागतात, पण विमा असलेल्या रुग्णांना पाच तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
