lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 15 हजार टन कांदा आयातीसाठी मंजुरी; आगामी काळात दर कमी होण्याची शक्यता

15 हजार टन कांदा आयातीसाठी मंजुरी; आगामी काळात दर कमी होण्याची शक्यता

onion : आयात केलेला कांदा नाफेडडून बंदर असलेल्या शहरांत पुरविला जाईल. राज्यांनी आपापली गरज नोंदविण्याचे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 02:07 AM2020-11-07T02:07:56+5:302020-11-07T06:52:20+5:30

onion : आयात केलेला कांदा नाफेडडून बंदर असलेल्या शहरांत पुरविला जाईल. राज्यांनी आपापली गरज नोंदविण्याचे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.

Approval for import of 15 thousand tons of onion; The rate is likely to decrease in the coming period | 15 हजार टन कांदा आयातीसाठी मंजुरी; आगामी काळात दर कमी होण्याची शक्यता

15 हजार टन कांदा आयातीसाठी मंजुरी; आगामी काळात दर कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली : १५ हजार टन कांदा आयात करण्यासाठी नाफेडने आयातदार (बीडर) निश्चित केले असून, आयातीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. कांद्याचे वाढते भाव नियंत्रात ठेवण्यासाठी ही आयात करण्यात येत आहे.
आयात केलेला कांदा नाफेडडून बंदर असलेल्या शहरांत पुरविला जाईल. राज्यांनी आपापली गरज नोंदविण्याचे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे. कांद्याच्या अतिरिक्त पुरवठ्यासाठी नियमित निविदा जारी करण्याची नाफेडची योजना आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तुतीकोरीन आणि मुंबई बंदरांवर कांदा पुरविण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नाफेडच्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नाफेडने तातडीने संध्याकाळपर्यंतच निविदा मंजूर केल्या. कांदा वेळेवर बाजारात उपलब्ध व्हावा, असा नाफेडचा प्रयत्न आहे.

ग्राहकांच्या आवडी-निवडीचा आग्रह 
निविदा जारी करताना नाफेडने भारतीय ग्राहकांच्या आवडी-निवडीचा आग्रह धरला आहे. भारतीय ग्राहक मध्यम आकाराच्या कांद्याला प्राधान्य देतात. विदेशी कांदा साधारणपणे ८० मि.मी. पेक्षा जास्त मोठा असतो. असा कांदा यंदा आयात केला जाणार नाही. तशी अट निविदांत घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी एमएमटीसीने तुर्कस्तान आणि इजिप्तमधून पिवळा, गुलाबी आणि लाल कांदा आयात केला होता. या कांद्याचा आकार मोठा होता. त्यामुळे त्याला ग्राहकच मिळाला नव्हता.

Web Title: Approval for import of 15 thousand tons of onion; The rate is likely to decrease in the coming period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन