lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका सरकारचा Apple कंपनीला मोठा धक्का! शेअर बाजारातही फटका; ११३ अब्ज डॉलर्सचे नुकसान

अमेरिका सरकारचा Apple कंपनीला मोठा धक्का! शेअर बाजारातही फटका; ११३ अब्ज डॉलर्सचे नुकसान

Apple : ॲपल कंपनीवर अमेरिकेतील न्याय विभागाने गंभीर आरोप केले आहेत. कंपनीने कायद्याचे उल्लंघन केले नसते तर फोनसाठी एवढे पैसे मोजावे लागले नसते, असं न्याय विभागाने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:02 AM2024-03-22T11:02:16+5:302024-03-22T11:08:45+5:30

Apple : ॲपल कंपनीवर अमेरिकेतील न्याय विभागाने गंभीर आरोप केले आहेत. कंपनीने कायद्याचे उल्लंघन केले नसते तर फोनसाठी एवढे पैसे मोजावे लागले नसते, असं न्याय विभागाने म्हटले आहे.

apple accused of monopolizing smartphone markets usa government | अमेरिका सरकारचा Apple कंपनीला मोठा धक्का! शेअर बाजारातही फटका; ११३ अब्ज डॉलर्सचे नुकसान

अमेरिका सरकारचा Apple कंपनीला मोठा धक्का! शेअर बाजारातही फटका; ११३ अब्ज डॉलर्सचे नुकसान

Apple : जगातील प्रसिद्ध मोबाईल कंपनी Appleला अमेरिका सरकारने जोरदार झटका दिला आहे. यामुळे कंपनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  अमेरिकेतील न्याय विभागाने ॲपल कंपनीने मार्केटमध्ये बेकायदेशीर मक्तेदारी कायम ठेवल्याचा आरोप केला आहे. तसेच अयोग्यरित्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना मार्केटपासून दूर ठेवण्याची आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा आरोप करण्यात आला आहे.या आरोपांमुळे आता कंपनीच्या अडचणी वाढल्या असून याचा परिणाम कंपनीच्या शेअरही दिसून आला आहे. 

अदानींना मिळाली महिंद्रांची साथ, आता ईव्ही क्षेत्रात करणार कमाल; EV वाहनधारकांसाठी गूड न्यूज

ॲपल विरोधात अमेरिकेच्या न्याय विभागाने आणि १६ राज्यांच्या अटर्नी जनरल्सनी बेकायदेशीर मक्तेदारी कायम ठेवल्याबद्दल ॲपलवर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲपलवर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये मक्तेदारी कायम ठेवण्याचा आणि इतर कंपन्यांना बाजारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यामुळेच ग्राहकांना कंपनीच्या मोबाईलसाठी जास्त पैसे मोजावे लागतात, असंही या आरोपात म्हटले आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेल्या आरोप 

'Apple कंपनीने जर कायद्याचा आदर केला असता तर ग्राहकांना आयफोनसाठी एवढ्या किमती मोजाव्या लागल्या नसत्या. एवढे महाग फोन झाले नसते. कंपनीने मार्केटमध्ये नवे तंत्रज्ञान आणलेले नाही, उलट इतर कंपन्यांना स्पर्धेपासून दूर ठेवले आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी पर्याय मिळतात. एखाद्याला जास्त किंमत मोजावी लागते आणि खराब दर्जाची ॲप्स मिळवावी लागतात.

अॅपल आपल्या App स्टोअरवर बाहेरचे अॅप ठेवण्यास अडचणी निर्माण करते, असा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे बाह्य ॲप्स चांगली कामगिरी करत नाहीत. असे करून ॲपलने गेल्या १५ वर्षांत ॲप स्टोअरवरून कोणत्याही बाह्य ॲपच्या खरेदीवर किंवा पेमेंटवर ३०% कमिशन घेतले आहे. 

शेअर मार्केटमध्येही फटका

ॲपलला शेअर बाजारात मोठा धक्का बसला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबर दरम्यान भारताची अमेरिकेला स्मार्टफोनची निर्यात ३.५३ अब्ज डॉलर झाली आहे, जी आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या याच कालावधीत ९९८ मिलियन डॉलर होती. मात्र, आता गुरुवारी ॲपल कंपनीचे शेअर ४.१ टक्क्यांनी घसरले. यामुळे एकाच दिवसात कंपनीच्या बाजारमूल्यात सुमारे ११३ अब्ज डॉलरची घसरण झाली.

Web Title: apple accused of monopolizing smartphone markets usa government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.