Lokmat Money > बिझनेस न्यूज > Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

Anthem Biosciences Ltd IPO Listing: जरी आज शेअर बाजारात घसरणीचं वातावरण दिसून येत असलं तरी या स्टॉकचं शेअर बाजारात तुफान लिस्टिंग झालं. पहिल्याच दिवशी या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:20 IST2025-07-21T11:20:28+5:302025-07-21T11:20:28+5:30

Anthem Biosciences Ltd IPO Listing: जरी आज शेअर बाजारात घसरणीचं वातावरण दिसून येत असलं तरी या स्टॉकचं शेअर बाजारात तुफान लिस्टिंग झालं. पहिल्याच दिवशी या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

Anthem Biosciences Ltd IPO Listing Profit of rs 153 on each share on the first day Price crosses rs 740 investors get rich | Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

Anthem Biosciences Ltd IPO Listing: जरी आज शेअर बाजारात घसरणीचं वातावरण दिसून येत असलं तरी अँथम बायोसायन्सेसचं शेअर बाजारात तुफान लिस्टिंग झालं. कंपनीचे शेअर्स बीएसई वर ७२३.०५ रुपयांना लिस्ट झाले. हे शेअर्स २६.८५ टक्क्यांच्या प्रीमिअमवर लिस्ट झाले असून गुंतवणूकदारांना १५३.०५ रुपयांचा फायदा झाला. त्याच वेळी, कंपनीची एनएसईवर लिस्टिंग २६.८६ टक्के किंवा १५३.१० रुपयांच्या वाढीसह ७२३.१० रुपयांवर झाली. लिस्टिंगनंतर, कंपनीच्या शेअर्सनी कामकाजादरम्यान एनएसईवर ७४० रुपयांची पातळी ओलांडली. ग्रे मार्केटनुसारही या शेअरच्या मजबूत लिस्टिंगचे संकेत मिळत होते.

हा आयपीओ निव्वळ ऑफर फॉर सेल (ओएफएस) होता. म्हणजेच कंपनीचे विद्यमान भागधारक (जसं प्रवर्तक, गुंतवणूकदार किंवा इतर मोठे भागधारक) त्यांच्याकडे असलेल्या कंपनीचे शेअर्स विकणार आहेत. म्हणजेच कंपनी पैसे उभा करण्यासाठी नवे शेअर्स जारी करत नसून आधीच अस्तित्वात असलेले शेअर्स विकले जात आहेत. Anthem Biosciences IPO गुंतवणुकीसाठी १४ जुलैपासून खुला झाला होता आणि त्यात १६ जुलैपर्यंत गुंतवणूक करता येणार होती.

Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?

किती गुंतवणूक करावी लागली?

अँथेम बायोसायन्सेस लिमिटेडनं आयपीओची (Anthem Biosciences IPO) प्राईज बँड ५४० ते ५७० रुपये निश्चित केली होती. किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी एक लॉट म्हणजेच २६ शेअर्ससाठी बोली लावू शकणार होते. जर तुम्ही आयपीओच्या अपर प्राइस बँडवर म्हणजेच ५७० रुपयांवर १ लॉटसाठी अर्ज केला असता तर तुम्हाला १४,८२० रुपयांची गुंतवणूक करावी लागली असती. तर, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉट म्हणजेच ३३८ शेअर्ससाठी अर्ज करू शकणार होते. यासाठी गुंतवणूकदारांना १,९२,६६० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. हा शेअर जबरदस्त लिस्टिंग करू शकतो असे संकेत ग्रे मार्केटमधून मिळत होते.

कंपनी काय करते?

अँथेम बायोसायन्सेस लिमिटेड (Anthem Biosciences Limited), २००६ मध्ये स्थापन झाली असून ती फार्मास्युटिकल रिसर्च, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग (सीआरडीएमओ) मध्ये काम करणारी कंपनी आहे. ही कंपनी मेडिसिन रिसर्च, डेव्हलप आणि उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया एकत्रितपणे चालवते. ही कंपनी जागतिक स्तरावर छोट्या बायोटेक कंपन्या आणि मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्यांना सेवा पुरवते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Anthem Biosciences Ltd IPO Listing Profit of rs 153 on each share on the first day Price crosses rs 740 investors get rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.