Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठ्या संकटात भारताच्या मदतीला जुना मित्र धावला; कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्याची रशियाची तयारी

मोठ्या संकटात भारताच्या मदतीला जुना मित्र धावला; कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्याची रशियाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ रोखल्यामुळे तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 04:40 IST2026-03-06T04:40:08+5:302026-03-06T04:40:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ रोखल्यामुळे तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला ...

An old friend came to India's aid in a major crisis; Russia ready to continue supplying crude oil | मोठ्या संकटात भारताच्या मदतीला जुना मित्र धावला; कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्याची रशियाची तयारी

मोठ्या संकटात भारताच्या मदतीला जुना मित्र धावला; कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्याची रशियाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ रोखल्यामुळे तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला मोठा दिलासा दिला आहे. रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी नेहमीच तयार आहे, असे रशियन राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी गुरुवारी सांगितले.

युद्धामुळे जगातील २० टक्के तेल व ‘एलएनजी’ची वाहतूक होणारा होर्मुझचा मार्ग बंद झाला आहे. भारत आपल्या गरजेच्या ८८ टक्के कच्चे तेल आणि ५० टक्के नैसर्गिक वायू आयात करतो.

मिळाला मोठा दिलासा, तेलाचे दर कमीच राहणार
 युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीत वाहतुकीवरील वाढते धोके यामुळे तेलबाजारात अस्थिरता निर्माण झाली असली तरी २०२६मध्ये ब्रेंट क्रूडचा सरासरी दर ६३ डॉलर प्रति बॅरलपेक्षा फारसा वाढणार नाही. मात्र, सामुद्रधुनी दीर्घकाळासाठी बंद राहिली तर किंमतीमध्ये तीव्र वाढ होण्याचा अंदाज फिच रेटिंग्जने व्यक्त केला आहे.

ट्रम्प यांच्यामुळे अडथळे
भारताने रशियाकडून तेल न घेण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी भारतावर लादलेले अतिरिक्त २५ टक्के शुल्कही ट्रम्प यांनी मागे घेतले आहे. मात्र, रशियाने पुन्हा पुरवठ्याची तयारी दर्शवल्याने भारतासमोर पेच निर्माण झाला आहे. भारताने तेल आयातीत विविध स्रोत ठेवण्यावर भर दिला आहे. राष्ट्रीय हित लक्षात घेत विविध देशांकडून तेल खरेदी केली जाईल, अशी भूमिका केंद्र सरकारने ठेवली आहे. 

कच्च्या तेलाच्या किमतीत प्रतिबॅरल 
१० डॉलर्सची वाढ झाल्यास भारताच्या वार्षिक तेल आयात बिलात तब्बल 
१३ ते १४ अब्ज डॉलर्सची वाढ होऊ शकते. यामुळे देशाची चालू खात्यातील तूट वाढेल. शिवाय भारतीय रुपयावर दबाब निर्माण होऊन त्याचे मूल्य घसरण्याची शक्यता आहे.
अमिताभ कांत, नीती आयोगाचे 
माजी सीईओ

सध्याचे तेलाचे दर किती? 
तेल    सध्याचे     किती 
    दर    वाढ
डब्ल्यूटीआय    क्रूड ७७.११    ३% 
ब्रेंट क्रूड    ८४    ३% 
मर्बन क्रूड    ९३    १३% 
नॅचरल गॅस    २.९७३    २% 
गॅसोलीन    २.५९५    ३% 
इथॅनॉल    १.८००    ११% 
ओपेक बास्केट    ६९    १%

Web Title : वैश्विक संकट के बीच रूस भारत की तेल मदद के लिए तैयार

Web Summary : होर्मुज जलडमरूमध्य में तनाव के कारण तेल की बढ़ती कीमतों के बीच, रूस ने भारत को कच्चे तेल की आपूर्ति करने की पेशकश की है। भारत अपने तेल स्रोतों में विविधता ला रहा है, लेकिन यह प्रस्ताव एक राहत के रूप में आया है, हालांकि संभावित अमेरिकी शुल्क एक दुविधा पैदा करते हैं। बढ़ती तेल की कीमतें भारत की अर्थव्यवस्था को प्रभावित कर सकती हैं।

Web Title : Russia Ready to Help India with Oil Amidst Global Crisis

Web Summary : Amidst rising oil prices due to tensions in the Hormuz Strait, Russia has offered to supply crude oil to India. While India is diversifying its oil sources, this offer comes as a relief, though potential US tariffs create a dilemma. Rising oil prices could impact India's economy.