Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार

अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचा टर्नओव्हर पहिल्यांदाच १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा टर्नओवर ९०,००० कोटी रुपये होता, अर्कंथात कंपनीच्या व्यवसायात यंदा ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 18:12 IST2026-04-05T18:09:30+5:302026-04-05T18:12:18+5:30

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचा टर्नओव्हर पहिल्यांदाच १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा टर्नओवर ९०,००० कोटी रुपये होता, अर्कंथात कंपनीच्या व्यवसायात यंदा ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Amul creates history Huge demand from India to America and Europe; Annual turnover crosses Rs 1 lakh crore | अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार

अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार

अमूलने (Amul) वित्त वर्ष २०२६ मध्ये १ लाख कोटी रुपयांचा (१ ट्रिलियन) टर्नओव्हवर पार करत इतिहास रचला आहे. ही अभूतपूर्व कामगिरी केवळ कंपनीची वेगवान वाढच दर्शवत नाही तर भारतीय 'को-ऑपरेटिव्ह मॉडेल' आज जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचेही दर्शवते. दरम्यान, 'गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (Gujarat Co-operative Milk Marketing Federation -GCMMF) एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचा टर्नओव्हर पहिल्यांदाच १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा टर्नओवर ९०,००० कोटी रुपये होता, अर्कंथात कंपनीच्या व्यवसायात यंदा ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.

लाखो ग्राहकांचा, शेतकऱ्यांचा विश्वास -
यासंदर्भात बोलताना कंपनीचे अध्यक्ष अशोक चौधरी म्हणाले, "१ लाख कोटींचा टप्पा पार करणे हे लाखो ग्राहकांचा विश्वास आणि ३६ लाख दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. अमूलला नुकतेच 'इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स'ने जगातील नंबर १ को-ऑपरेटिव्ह म्हणून घोषित केले आहे. यामुळे GCMMF ने देशातील सर्वात मोठी एफएमसीजी (FMCG) संस्था म्हणून आपले स्थान अधिक घट्ट केले आहे. कंपनीकडे सध्या १२०० हून अधिक उत्पादने आणि व्यापक वितरण नेटवर्क आहे.

असा सुरू झाला प्रवास -
GCMMF ५० हून अधिक देशांमध्ये दरवर्षी २४ अब्जांहून अधिक डेअरी उत्पादनांच्या पॅकची विक्री करते. यामध्ये दूध, बटर, चीज, तूप आणि आइस्क्रीमचा समावेश आहे. गेल्या वर्षी कंपनीची विक्री ७३,४५० कोटी रुपये होती, जी २०२४-२५ च्या तुलनेत ११.४ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने अलीकडेच युरोप आणि अमेरिकेत ताजे दूध लाँच केले असून, रोज ३१ लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते. १९७३-७४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत गुजरातच्या १८ जिल्हा दुग्ध संघांचा समावेश आहे.

 

Web Title : अमूल ने रचा इतिहास: वैश्विक स्तर पर ₹1 लाख करोड़ का कारोबार पार!

Web Summary : अमूल ने 2026 तक ₹1 लाख करोड़ का कारोबार पार कर इतिहास रचा। किसानों के भरोसे और वैश्विक मांग से प्रेरित, अमूल का यूरोप और अमेरिका में विस्तार। जीसीएमएमएफ अब दुनिया का नंबर 1 सहकारी।

Web Title : Amul Achieves Milestone: Crosses ₹1 Lakh Crore Turnover Globally!

Web Summary : Amul made history, surpassing ₹1 lakh crore turnover by 2026. Driven by farmer trust and global demand, Amul expands into Europe and America. GCMMF is now world's No. 1 cooperative.