Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...

अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अयोध्येत कोट्यवधी रुपयांचे चार भूखंड खरेदी केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:35 IST2025-05-29T11:35:35+5:302025-05-29T11:35:51+5:30

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अयोध्येत कोट्यवधी रुपयांचे चार भूखंड खरेदी केले आहेत.

Amitabh Bachchan's big investment in Ayodhya; Purchased a plot worth Rs 40 crore | अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...

अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांना रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याची आवड आहे. त्यांनी मुंबईत अनेक घरे/फ्लॅट्स/जमिनी खरेदी केल्या आहेत. पण, आता त्यांनी आपला मोर्चा अयोध्येकडे वळवला आहे. गेल्या काही काळापासून ते अयोध्येत मोठी गुंतवणूक करत आहेत. आता त्यांनी अयोध्येत तब्बल 40 कोटी रुपयांची 25,000 चौरस फूट जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. 

विशेश म्हणजे, अमिताभ बच्चन यांची अयोध्येत ही त्यांची चौथी गुंतवणूक आहे. त्यांची ही नवीन जमीन अयोध्येच्या हाय-प्रोफाइल रिअल इस्टेट प्रकल्प द सरयूमध्ये आहे. हा शेकडो एकरांवर पसरलेला एक आलिशान निवासी टाउनशिप प्रकल्प आहे. हा द हाऊस ऑफ अभिनंदन लॉजिक्स द्वारे विकसित केला जात असून, त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा पुरवल्या जात आहेत. यावरुन स्पष्ट होते की, अमिताभ बच्चन अयोध्या शहरासाठी दीर्घकालीन नियोजन करत आहेत.

बिग बी काय म्हणाले?
बच्चन यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, "अयोध्येच्या ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमुळे मला येथे गुंतवणूक करण्याची प्रेरणा मिळाली. मी या शहराशी असलेल्या माझ्या संबंधाबद्दल उत्साहित आहे आणि येथे एक सुंदर निवासी घर बांधण्याची योजना आहे." प्रकल्पाच्या विकासकांचे म्हणणे आहे की, बच्चन यांचा या प्रकल्पाशी असलेला संबंध केवळ अयोध्येतील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी मोठा नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराची प्रतिमा देखील मजबूत करेल.

याआधीही त्यांनी 3 जमिनी खरेदी केल्या 
अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी बॉलिवूड निर्माता आनंद पंडित यांच्या मालकीच्या रिअल इस्टेट फर्ममध्ये प्रत्येकी 10 कोटी रुपये गुंतवले होते. अयोध्येत त्यांच्या मागील गुंतवणुकीत गेल्या वर्षी राम मंदिर उद्घाटनापूर्वी 4.54 कोटी रुपयांना खरेदी केलेला 5,372 चौरस फूट भूखंड समाविष्ट आहे. अयोध्या रिअल इस्टेटमध्ये त्यांचा रस येथूनच सुरू झाला. बच्चन कुटुंब अयोध्येबाहेरही सक्रियपणे त्यांच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. 2023 मध्ये अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनी संयुक्तपणे 25 कोटी रुपयांचे १० अपार्टमेंट खरेदी केले.

बच्चन यांची एकूण संपत्ती 
जया बच्चन यांनी गेल्या वर्षी राज्यसभेत जाहीर करताना सांगितले होते की, त्यांच्याकडे एकूण 1,578 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची जंगम मालमत्ता 849.11 कोटी रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता 729.77 कोटी रुपये आहे. 

 

Web Title: Amitabh Bachchan's big investment in Ayodhya; Purchased a plot worth Rs 40 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.