lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Flipkart सेलच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन खोटे बोलतायेत, CAIT चा आरोप

Flipkart सेलच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन खोटे बोलतायेत, CAIT चा आरोप

काही डील केवळ फ्लिपकार्टवर ग्राहकांसाठी उपलब्ध असतील आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळू शकत नाहीत, असा दावा केला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 04:41 PM2023-10-03T16:41:07+5:302023-10-03T16:56:19+5:30

काही डील केवळ फ्लिपकार्टवर ग्राहकांसाठी उपलब्ध असतील आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळू शकत नाहीत, असा दावा केला जात आहे. 

amitabh bachchan accused for misleading advertisement related to flipkart sale  | Flipkart सेलच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन खोटे बोलतायेत, CAIT चा आरोप

Flipkart सेलच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन खोटे बोलतायेत, CAIT चा आरोप

नवी दिल्ली : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) पुढील आठवड्यात बिग बिलियन डेज सेल ( Big Billion Days Sale) सुरू होणार आहे, ज्यासाठी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना देखील ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) अमिताभ बच्चन यांच्यावर या सेलसाठी केलेल्या जाहिरातीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, त्यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावरही अनेक यूजर्स या जाहिरातीवर टीका करत आहेत.

जाहिरातीत खोटे दावे केल्याचा आरोप करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने फ्लिपकार्ट आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणकडे (CCPA) तक्रार दाखल केली आहे. ट्रेडर्सचे म्हणणे आहे की, फ्लिपकार्टद्वारे दिशाभूल करणारी जाहिरात दाखवली जात आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन खोटे दावे करून ऑफलाइन ट्रेडर्सला कमी लेखतात. दरम्यान, काही डील केवळ फ्लिपकार्टवर ग्राहकांसाठी उपलब्ध असतील आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळू शकत नाहीत, असा दावा केला जात आहे. 

अशी दिशाभूल करणारी जाहिरात दाखवल्याबद्दल आणि त्यासाठी अमिताभ बच्चन यांची मदत घेतल्याबद्दल फ्लिपकार्टला मोठा दंड ठोठावण्यात यावा, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भारतीय आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे. तसेच, अशा जाहिरातींचा देशभरातील छोट्या दुकानदारांवर परिणाम होईल आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो, असेही बीसी भारतीय आणि प्रवीण खंडेलवाल यांचे म्हणणे आहे.

सेलची बऱ्याच दिवसांपासून जाहिरात
फ्लिपकार्ट आपल्या बिग बिलियन डेज सेलची बऱ्याच दिवसांपासून जाहिरात करत आहे. जाहिराती देखील वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवल्या जात आहेत. अनेक जाहिरातींपैकी एका जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन सेल दरम्यान उपलब्ध डील्सबद्दल म्हणतात, 'ये दुकान पर नहीं मिलने वाला'. या दाव्यावरून असे म्हटले जात आहे की, ते ऑफलाइन बाजारातील दुकानदारांना कमी लेखतात आणि ते उत्कृष्ट सवलती आणि ऑफर देखील देत आहेत.

अमिताभ बच्चन यांनाही पत्र
ही जाहिरात शॉपिंग फ्लिपकार्टने YouTube वर देखील शेअर केली होती, पण आता ती प्रायव्हेट करण्यात आली आहे. म्हणजेच आता व्ह्युअर्स ती जाहिरात YouTube वर पाहू शकत नाहीत. मात्र, अद्याप या संपूर्ण प्रकरणाबाबत फ्लिपकार्टकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या जाहिरातीत केलेल्या भ्रामक दाव्याबाबत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने अमिताभ बच्चन यांनाही पत्रही पाठवले असून, त्यांनी हा दावा कोणत्या आधारावर केला आहे, अशी विचारणा केली आहे.

Web Title: amitabh bachchan accused for misleading advertisement related to flipkart sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.