Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली

अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली

ऑपरेशन सिंदूरचा प्रभाव आता चीनसह अमेरिकेतही जाणवू लागलाय. पाकिस्ताननं केलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या खोट्या दाव्यांचा परिणाम आता चीन आणि अमेरिकेच्या कंपन्यांना भोगावा लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:36 IST2025-06-03T11:35:38+5:302025-06-03T11:36:51+5:30

ऑपरेशन सिंदूरचा प्रभाव आता चीनसह अमेरिकेतही जाणवू लागलाय. पाकिस्ताननं केलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या खोट्या दाव्यांचा परिणाम आता चीन आणि अमेरिकेच्या कंपन्यांना भोगावा लागत आहे.

America and China supported pakistan operation sindoor impact on f 16 making company stock gives zero return | अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली

अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली

ऑपरेशन सिंदूरचा प्रभाव आता चीनसह अमेरिकेतही जाणवू लागलाय. विशेषतः संरक्षण क्षेत्रासाठी वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झालेत. ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या काळात पाकिस्ताननंचीनच्या लढाऊ विमानांमध्ये राफेल पाडल्याचा दावा केला होता. यामुळे चीनच्या एव्हीआयसी चेंगदू एअरक्राफ्टच्या शेअरमध्ये लक्षणीय वाढ झाली. पण ऑपरेशन सिंदूरचं सत्य जसं जगासमोर येत आहे, तसतशी पाकिस्तानची कुरापतीही उघडकीस येत आहेत. यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलंय. तर दुसरीकडे आता एफ-१६ लढाऊ विमान बनवणाऱ्या लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपनीलाही फटका बसलाय.

पाकिस्तान या विमानाचा वापर करतो. परंतु गेल्या महिनाभरात लॉकहीड मार्टिनच्या शेअरच्या किंमतीत कोणताही विशेष बदल झालेला नाही. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवस लष्करी संघर्ष झाला होता. १२ मे रोजी लॉकहीड मार्टिनच्या शेअरवर प्रचंड दबाव दिसून आला. शेअर थोड्या वेळानं सावरला असला तरी मे महिन्यात शेअरचा भाव जवळपास स्थिर राहिला. मे महिन्यात शेअरची किंमत केवळ ०.९७ टक्क्यांनी वाढली आणि महिन्याच्या अखेरीस ती ४८२.३८ डॉलरवर पोहोचली. एप्रिलमध्ये हा शेअर ६.९५ टक्क्यांनी वधारला होता.

Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’

शेअर्स मध्ये घसरण का झाली?

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. याचा परिणाम लॉकहीड मार्टिनच्या व्यवसायावर होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यांना नवीन ऑर्डर मिळण्यात अडचण येऊ शकतात. यामुळेच लॉकहीड मार्टिनच्या शेअरमध्ये कमकुवत परतावा मिळत आहे. लॉकहीड मार्टिनव्यतिरिक्त चिनी कंपनी एव्हीआयसी चेंगदू एअरक्राफ्टचे शेअर्सही मे महिन्यातील उच्चांकी स्तराहून खाली घसरलेत. हा शेअर १२ मेच्या उच्चांकी पातळीवरून २० टक्क्यांनी घसरला आहे. ही चिनी कंपनी जे-१० लढाऊ विमानांची निर्मिती करते.

Web Title: America and China supported pakistan operation sindoor impact on f 16 making company stock gives zero return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.