Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹२० च्या खाली आला 'हा' शेअर, सातत्यानं होतेय घसरण; मुकेश अंबानींची आहे गुंतवणूक

₹२० च्या खाली आला 'हा' शेअर, सातत्यानं होतेय घसरण; मुकेश अंबानींची आहे गुंतवणूक

Alok Industries Share: कंपनीचा शेअर ५.४९ टक्क्यांनी घसरून १८.४२ रुपयांवर पोहोचला. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली असून हा शेअर १३ टक्क्यांहून अधिक घसरलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:54 IST2025-01-13T15:54:29+5:302025-01-13T15:54:29+5:30

Alok Industries Share: कंपनीचा शेअर ५.४९ टक्क्यांनी घसरून १८.४२ रुपयांवर पोहोचला. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली असून हा शेअर १३ टक्क्यांहून अधिक घसरलाय.

Alok Industries Share fell below rs 20 continues to decline Mukesh Ambani is an investor | ₹२० च्या खाली आला 'हा' शेअर, सातत्यानं होतेय घसरण; मुकेश अंबानींची आहे गुंतवणूक

₹२० च्या खाली आला 'हा' शेअर, सातत्यानं होतेय घसरण; मुकेश अंबानींची आहे गुंतवणूक

Alok Industries Share: वस्त्रोद्योग कंपनी आलोक इंडस्ट्रीजचे शेअर्स चर्चेचा विषय ठरत आहेत. कंपनी या आठवड्यात डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करेल. अशा स्थितीत शेअर्स अॅक्शनमध्ये राहू शकतात. सोमवारी व्यवहारादरम्यान मोठी घसरण पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर ५.४९ टक्क्यांनी घसरून १८.४२ रुपयांवर पोहोचला. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली असून हा शेअर १३ टक्क्यांहून अधिक घसरलाय. मुंबईस्थित कापड निर्मिती कंपनी अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची असून आलोक इंडस्ट्रीजचे ४०.०१ टक्के शेअर्स त्यांच्याकडे आहेत. म्हणजेच मुकेश अंबानी यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

आलोक इंडस्ट्रीजनं ९ जानेवारी २०२५ च्या एक्सचेंज रिपोर्टमध्ये म्हटलंय की, कंपनी २१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/९ महिन्यांचं उत्पन्न जाहीर करेल. त्यासाठीची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडने बीएसईला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक १६ जानेवारी रोजी होणार आहे, ज्यामध्ये ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी कंपनीच्या स्वतंत्र आणि एकत्रित अनऑडिटेड आणि स्टँडअलोन निकालांचा विचार आणि मंजुरी दिली जाईल.

शेअर्सची स्थिती काय?

आलोक इंडस्ट्रीजचा शेअर गेल्या तीन महिन्यांत २०.७४ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरनं २८.६४ टक्के नकारात्मक परतावा दिलाय. गेल्या आणि तीन वर्षांत कंपनीचे शेअर्स अनुक्रमे ४६.२५ टक्के आणि २५.०१ टक्क्यांनी घसरलेत. मात्र, गेल्या दोन, पाच आणि दहा वर्षांत आलोक इंडस्ट्रीजने अनुक्रमे २९.७१ टक्के, ५७२.६४ टक्के आणि ९९.७० टक्के सकारात्मक परतावा दिलाय. बीएसई ५०० वर कंपनीचे मार्केट कॅप ९,२२५.४२ कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Alok Industries Share fell below rs 20 continues to decline Mukesh Ambani is an investor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.