Lokmat Money > बिझनेस न्यूज > "या डोळ्यांपुढे जगातली सर्व संपत्ती फिकी...!" नव्या अंदाजात दिसले अब्जाधीश गौतम अदानी

"या डोळ्यांपुढे जगातली सर्व संपत्ती फिकी...!" नव्या अंदाजात दिसले अब्जाधीश गौतम अदानी

गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत एक चिमुकली दिसत आहे. ही चिमुकली म्हणजे, गोतम अदानी यांची 14 महिन्यांची नात कावेरी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 07:17 PM2024-04-02T19:17:49+5:302024-04-02T19:18:25+5:30

गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत एक चिमुकली दिसत आहे. ही चिमुकली म्हणजे, गोतम अदानी यांची 14 महिन्यांची नात कावेरी आहे.

All the wealth of the world fades before these eyes Gautam adani post for granddaughter | "या डोळ्यांपुढे जगातली सर्व संपत्ती फिकी...!" नव्या अंदाजात दिसले अब्जाधीश गौतम अदानी

"या डोळ्यांपुढे जगातली सर्व संपत्ती फिकी...!" नव्या अंदाजात दिसले अब्जाधीश गौतम अदानी

भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाचे संस्थापक-अध्यक्ष गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत एक चिमुकली दिसत आहे. ही चिमुकली म्हणजे, गोतम अदानी यांची 14 महिन्यांची नात कावेरी आहे. या फोटो सोबतच त्यांनी एक सुंदर असा मैसेजही लिहिला आहे. कावेरी ही गोतम अदानी यांचे पुत्र करण अदानी आणि सून परिधी यांची तिसरी कन्या आहे.

गौतम अदीनी यानी केली अशी पोस्ट - 
सोशल मीडिया अकाउंट एक्सवर शेअर केलेल्या फोटोमध्ये गौतम अदानी आपल्या नातीला कडेवर घेऊन हसताना दिसत आहेत. या फोटोला त्यांनी सुंदर असे कॅप्शनही दिले आहे. "या डोळ्यांच्या निरागसतेसमोर जगातील सर्व संपत्ती फिकी आहे,' असे त्यांनी लिहिले आहे. हा फोटो लंडनच्या सायन्स म्यूझियममधी न्यू अदानी ग्रीन एनर्जी गॅलरीमध्ये घेण्यात आला आहे. या फोटोमध्ये गौतम अदानी यांची पत्नी आणि कावेरीचे आई-वडीलही स्मित करताना दिसत आहेत. 

अदानींची संपत्ती किती?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या वृत्ताप्रमाणे, अदानी यांच्या सपत्तीत 825 मिलियन डॉलर्स म्हणजेच 6800 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली होती. यानंतर त्यांची एकूण संपत्ती 95.9 अब्ज डॉलरवर पोहोचली होती. या आकडेवारीनुसार, अदानी हे जगातील 14 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहे.


 

Web Title: All the wealth of the world fades before these eyes Gautam adani post for granddaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.