Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

Akzo Nobel India Ltd Dividend Stock: कंपनी गुंतवणुकदारांना आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश देणार आहे. या बातमीमुळे शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:50 IST2025-08-04T16:49:00+5:302025-08-04T16:50:48+5:30

Akzo Nobel India Ltd Dividend Stock: कंपनी गुंतवणुकदारांना आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश देणार आहे. या बातमीमुळे शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली.

Akzo Nobel India Ltd Dividend Stock company that will pay a dividend of Rs 156 per share even before the record date of August 15 | एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

Akzo Nobel India Ltd Dividend Stock: आज, ४ ऑगस्ट रोजी, अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडनं (Akzo Nobel India Ltd) तिमाही निकालांसह लाभांश जाहीर केला आहे. यावेळी कंपनी गुंतवणुकदारांना आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश देणार आहे. या बातमीमुळे अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. त्यामुळे शेअर्सची किंमत सुमारे ४ टक्क्यांनी वाढली आहे.

प्रति शेअर १५६ रुपये लाभांश

एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, प्रति शेअर १५६ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी हा अंतरिम लाभांश देत आहे. अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडने या लाभांशासाठी ११ ऑगस्ट २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणुकदारांकडे या दिवशी कंपनीचे शेअर्स असतील त्यांना प्रत्येक शेअरवर १५६ रुपयांचा फायदा मिळेल.

Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?

निव्वळ नफ्यात घट

अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार वार्षिक आधारावर निव्वळ नफ्यात २०.६० टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ९१ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ११४.६० कोटी रुपये होता. महसूलही वार्षिक आधारावर ४ टक्क्यांनी घटून ९९५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो १०३६.३० कोटी रुपये होता.

शेअर्सची कामगिरी कशी आहे?

आज शेअर ३५५१.०५ रुपयांवर उघडला. कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे ४ टक्क्यांनी वाढून ३७७९.८० रुपयांवर पोहोचली. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, १ वर्षात या शेअरमध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Akzo Nobel India Ltd Dividend Stock company that will pay a dividend of Rs 156 per share even before the record date of August 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.