Akshay Kumar Apartment Sell: अनेक अभिनेते अभिनेत्री रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करत असल्याचं तुम्ही यापूर्वीही ऐकलं असेल. बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आता चर्चेत आहे. अक्षय कुमारनं मुंबईतील बोरिवलीतील आपले दोन फ्लॅट ६.६ कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर आलीये. त्यापैकी एक फ्लॅट ५ कोटी ३५ लाख रुपयांना विकला गेला. तर दुसरा एक सव्वा कोटी रुपयांना विकला गेला आहे. रिअल इस्टेट फर्म स्क्वेअर यार्ड्सनं दिलेल्या माहितीनुसार, हे रहिवासी युनिट्स ओबेरॉय स्काय सिटीमध्ये आहेत. या युनिट्समध्ये कन्सल्टन्सी, हाऊसिंग ट्रान्झॅक्शन, मॉर्गेज अॅडव्हायझरी, होम इंटिरिअर आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंट अशा अनेक सेवांचा समावेश आहे. दोन्ही व्यवहारांची नोंदणी मार्च २०२५ मध्ये झाली होती.
अक्षय कुमारनं बोरिवलीतील दोन फ्लॅट विकून ६.६ कोटी रुपये कमावले आहेत. ओबेरॉय स्काय सिटीमधील हे फ्लॅट त्यानं विकले. एका फ्लॅटची किंमत ५.३५ कोटी रुपये आणि दुसऱ्या फ्लॅटची किंमत सव्वा कोटी रुपये होती. स्क्वेअर यार्ड्स नावाच्या रिअल इस्टेट कंपनीनं यासंदर्भातील माहिती दिलीये.
कितीला विकत घेतलेला फ्लॅट?
इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या (IGR) वेबसाइटनुसार, ५.३५ कोटी रुपयांना विकला गेलेला फ्लॅट नोव्हेंबर २०१७ मध्ये २.८२ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला होता. अशा प्रकारे त्याचं मूल्य ८९ टक्क्यांनी वाढले. या अपार्टमेंटचे कार्पेट एरिया १००.३४ चौरस मीटर (१,०८० चौरस फूट) आहे. त्यात ३२.१ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आलं.
अक्षय कुमारनं एक अपार्टमेंट सव्वा कोटी रुपयांना विकलं. २०१७ मध्ये ६७.१९ लाख रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं. अशा प्रकारे त्याचं मूल्य ८६ टक्क्यांनी वाढलं. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया २३.४५ चौरस मीटर (२५२ चौरस फूट) आहे. या व्यवहारासाठी साडेसात लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आलं.
दोन फ्लॅट कुठे होते?
ओबेरॉय स्काय सिटी २५ एकरमध्ये पसरलेली आहे. हे ओबेरॉय रियल्टीनं उभारलं आहे. यात थ्री बीएचके, थ्री बीएचके+ स्टुडिओ आणि डुप्लेक्स अपार्टमेंटसारखे रेडी-टू-मूव्ह निवासी प्रकल्प आहेत. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनीही मे २०२४ मध्ये ओबेरॉय स्काय सिटीमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या.
ओबेरॉय स्काय सिटीनं मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ८१८ कोटी रुपयांच्या एकूण ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूसोबत २०८ विक्री रजिस्ट्रेशची नोदणी केली. प्रोजेक्टमध्ये सरासरी रिसेल प्रॉपर्टीची किंत ४४,५७७ रुपये प्रति स्क्वेअर फुट आहे. म्हणजेच ओबेरॉय स्काय सिटीमध्ये प्रॉपर्टी खरेदी-विक्री फायदेशीर ठरू शकते. अक्षय कुमारनंही हेच सिद्ध केलं आहे. त्यानं आपले दोन फ्लॅट विकून चांगला नफा कमावलाय.