Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!

अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!

कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹ २३८.८५ तर नीचांक ₹ १५२ एवढा आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 22:08 IST2025-12-03T22:07:22+5:302025-12-03T22:08:41+5:30

कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹ २३८.८५ तर नीचांक ₹ १५२ एवढा आहे...

Ajay Devgan owns 100000 shares of this company, now the company has taken a big decision; It has given a bumper return of 6000%! | अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!

अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणची स्मॉलकॅप कंपनी पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलमध्ये (Panorama Studios International) मोठी गुंतवणूक आहे. अजय देवगणकडे या कंपनीचे १० लाख शेअर्स आहेत. ही कंपनी आता आपल्या भागधारकांना बोनस शेअर (फ्री शेअर्स) देण्याच्या तयारीत आहे. साधारणपणे गेल्या ६ वर्षांत या शेअरने तब्बल 6000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. पॅनोरमा स्टूडियोज इंटरनॅशनल, फिल्म प्रॉडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशनच्या व्यवसायाशी संंबंधित आहे. 

५:२ बोनस शेअर देण्याची तयारी -
कंपनी आपल्या भागधारकांना ५:२ या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. म्हणजेच, कंपनी प्रत्येक २ शेअर्समागे ५ बोनस शेअर देणार आहे. कंपनीने बोनस शेअरसाठी ५ डिसेंबर २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करत आहे. यापूर्वी कंपनीने जुलै २०२४ मध्ये शेअर १:५ प्रमाणात स्प्लिट कोला होता. अर्थात ₹१० फेस व्हॅल्यू असलेला शेअर ₹२-२ एवढी फेसव्हॅल्यू असलेल्या ५ शेअरमध्ये विभागला होता.

अजय देवगणची भागीदारी १.४१% -
सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीनुसार, पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलमध्ये सुपरस्टार अजय देवगणचा वाटा १.४१ टक्के आहे. तर, प्रवर्तकांचा हिस्सा ६४.९६ टक्के असून तर सार्वजनिक हिस्सेदारी ३५.०४ टक्के एवढी आहे.

६ वर्षांत ६०००% हून अधिकचा परतावा - 
पॅनोरमा स्टुडिओजच्या शेअर्समध्ये गत सहा वर्षांहून अधिक काळात ६०३७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हा शेअर २२ मार्च २०१९ रोजी ₹ २.७७ वर होता. तो ३ डिसेंबर २०२५ रोजी ₹ १७० वर बंद झाला. गेल्या पाच वर्षांत शेअरमध्ये १७७६ टक्क्यांची जोरदार वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹ २३८.८५ तर नीचांक ₹ १५२ एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title : अजय देवगन की कंपनी ने दिया 6000% रिटर्न, बोनस शेयर की घोषणा

Web Summary : अजय देवगन के पास पैनोरमा स्टूडियोज के 10 लाख शेयर हैं, जो 6 वर्षों में 6000% रिटर्न के बाद बोनस शेयर (5:2 अनुपात) जारी करेगी। देवगन की 1.41% हिस्सेदारी है। रिकॉर्ड तिथि 5 दिसंबर, 2025 है।

Web Title : Ajay Devgn's Company Gives 6000% Return, Announces Bonus Shares

Web Summary : Ajay Devgn owns 1 million shares of Panorama Studios, which will issue bonus shares (5:2 ratio) after a 6000% return in 6 years. Devgn holds 1.41% stake. Record date is December 5, 2025.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.