Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतात येतोय 'या' कंपनीचा ४४ लाख कोटींचा Ai प्रोजेक्ट; मुकेश अंबानी यांच्यासोबत चर्चा सुरू...

भारतात येतोय 'या' कंपनीचा ४४ लाख कोटींचा Ai प्रोजेक्ट; मुकेश अंबानी यांच्यासोबत चर्चा सुरू...

Ai Project India: गेल्या काही काळापासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रात वेगाने काम सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:15 IST2025-09-09T18:14:36+5:302025-09-09T18:15:26+5:30

Ai Project India: गेल्या काही काळापासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रात वेगाने काम सुरू आहे.

Ai Project India: Opne Ai's AI project worth Rs 44 lakh crore is coming to India; Discussions with Mukesh Ambani underway | भारतात येतोय 'या' कंपनीचा ४४ लाख कोटींचा Ai प्रोजेक्ट; मुकेश अंबानी यांच्यासोबत चर्चा सुरू...

भारतात येतोय 'या' कंपनीचा ४४ लाख कोटींचा Ai प्रोजेक्ट; मुकेश अंबानी यांच्यासोबत चर्चा सुरू...

Ai Project India: गेल्या काही काळापासून फक्त भारतातच नाही, तर जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस(Ai) क्षेत्रात वेगाने काम सुरू आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांचाही या क्षेत्रात मोठा रस आहे. तसेच, ChatGPT विकसित करणारी कंपनी OpneAi नेदेखील या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. दरम्यान, ओपन एआय आता भारतात एक मोठा प्रोजेक्ट आणणार आहे. हा प्रकल्प १०० किंवा २०० नाही, तर तब्बल ५०० अब्ज डॉलर्सचा (४४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहे.

ओपनएआय यासाठी देशातील अनेक डेटा सेंटर कंपन्यांशी चर्चा करत आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजशीही ओपन आआयची चर्चा सुरू आहे. मुकेश अंबानी स्वतः या क्षेत्रात खूप वेगाने वाटचाल करत आहेत. अलिकडेच कंपनीच्या वार्षिक सभेतून त्यांनी एआय संबंधित नवीन कंपनीची घोषणा केली होती. याशिवाय, जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर बांधण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. अशा परिस्थितीत, मुकेश अंबानी आणि त्यांच्या डेटा सेंटरसाठी ओपनएआय खूप महत्त्वाचा भागीदार ठरणार आहे. 

या कंपन्यांशी चर्चा सुरू 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओपनएआय कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित $500 अब्जचा प्रकल्प भारतात आणण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पासाठी, ओपनएआय एक आंतरराष्ट्रीय संयुक्त उपक्रम तयार करेल. यासाठी, ओपन एआय डेटा सेंटर कंपन्यांशी सिफी टेक्नॉलॉजीज, योटा डेटा सर्व्हिसेस, ई2ई नेटवर्क्स आणि सीटीआरएल डेटासेंटर्सशी प्राथमिक चर्चा करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजशीदेखील ओपनएआयची चर्चा सुरू आहे. 

भारत एक मोठी बाजारपेठ 
भारत सरकारने ओपनएआयला स्टारगेट प्रकल्प भारतात आणण्याची विनंती केल्यानंतर कंपनीने भारतात गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. सरकारने ओपनएआयला सांगितले आहे की, त्यांनी या ५०० अब्ज डॉलर्सच्या प्रकल्पातील किमान काही अब्ज डॉलर्स भारतात गुंतवावेत. भारत ओपनएआयसाठी एक प्रमुख बाजारपेठ बनत आहे आणि त्यात प्रचंड महसूल मिळविण्याची क्षमता देखील आहे, म्हणूनच कंपनीने ५०० अब्ज डॉलर्सच्या स्टारगेट प्रकल्पाचा मोठा भाग भारतात गुंतवण्याचे ठरवले आहे.

Web Title: Ai Project India: Opne Ai's AI project worth Rs 44 lakh crore is coming to India; Discussions with Mukesh Ambani underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.