Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनानंतर सेन्सेक्सच्या या २५ शेअर्सनं गुंतवणूकदारांना बनवलं श्रीमंत, मिळाले मल्टिबॅगर रिटर्न

कोरोनानंतर सेन्सेक्सच्या या २५ शेअर्सनं गुंतवणूकदारांना बनवलं श्रीमंत, मिळाले मल्टिबॅगर रिटर्न

मार्च २०२० मध्ये शेअर बाजार आपल्या नीचांकी स्तरावर पोहोचला होता. त्यानंत बीएसई सेन्सेक्स ३ पटींनी वाढून ६५००० अंकांच्या पुढे पोहोचलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:37 IST2023-07-04T16:34:14+5:302023-07-04T16:37:42+5:30

मार्च २०२० मध्ये शेअर बाजार आपल्या नीचांकी स्तरावर पोहोचला होता. त्यानंत बीएसई सेन्सेक्स ३ पटींनी वाढून ६५००० अंकांच्या पुढे पोहोचलाय.

After Corona pandemic these 25 shares of Sensex made investors rich tata motors tata steel fmgc got multibagger returns | कोरोनानंतर सेन्सेक्सच्या या २५ शेअर्सनं गुंतवणूकदारांना बनवलं श्रीमंत, मिळाले मल्टिबॅगर रिटर्न

कोरोनानंतर सेन्सेक्सच्या या २५ शेअर्सनं गुंतवणूकदारांना बनवलं श्रीमंत, मिळाले मल्टिबॅगर रिटर्न

कोरोनाच्या महासाथीमुळे संपूर्ण जग थांबलं होतं. या काळात मार्च २०२० मध्ये शेअर बाजार आपल्या नीचांकी स्तरावर पोहोचला होता. त्यानंत बीएसई सेन्सेक्स ३ पटींनी वाढून ६५००० अंकांच्या पुढे पोहोचलाय. यादरम्यान असे काही शेअर्स होते ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स.

कोरोना महासाथीचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरही झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत सेन्सेक्स १५० टक्क्यांनी वाढला आहे. मंगळवारी सेन्सेक्स ६५५०० अंकांच्या पुढे गेला होता. हा शेअर बाजाराचा आजवरचा उच्चांकी स्तर होता. इंडेक्समध्ये असलेल्या १७ शेअर्सनं गेल्या ३ वर्षांच्या कालावधीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. या शेअर्नं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. टाटा समुहाच्या चार कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना या संकटानंतर उत्तम परतावा दिलाय. यामध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील, टायटन यांचा समावेश आहे.

टाटा मोटर्सचे उत्तम रिटर्न
मार्च २०२० च्या नीचांकी स्तरावरून आतापर्यंत टाटा मोटर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना ७ पटींपेक्षा अधिक रिटर्न दिलेत. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये कोरोनानंतर ५ पट तेजी दिसून आली. टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती सुझुकीचे शेअर्स ३ वर्षांच्या कालावधीत मल्टिबॅगर रिटर्न देणारे ठरलेत.

यातही तेजी
कोरोना संकटाच्या दरम्यान नीचांकी स्तर गाठल्यानंतर स्टेट बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना २१५ ते ३०९ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिलेत. कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरनं तीन वर्षांच्या कालावधीत

६८ टक्क्यांचे रिटर्न दिले.
आयटी शेअर्सबद्दल सांगायचं झालं तर सर्वच कंपन्यांनी तीन वर्षांच्या कालावधीत मल्टिबँगर रिटर्न दिलेत. एचसीएल टेक्नॉलॉजीजनं चांगली कामगिरी केली आहे. तसंच त्यानं गुंतवणूकदारांना तीन पट रिटर्न दिलेत. इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना २०२० पासून आतापर्यंत १५१ टक्के रिटर्न दिलेत. कोरोनाच्या संकटादरम्यान घसरल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न दिलेत. ३ वर्षांमध्ये कंपनीच्या शेअरचं मूल्य तिप्पट झालंय. लार्सन अँड टुब्रोनंही शेअर धारकांना जबरदस्त रिटर्न दिलेत. एफएमजीसी सेक्टरबाबत सांगायचं झालं तर आयटीसीनं आपल्या गुंतवणूकदारांची संपत्ती तिप्पट केलीये.

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: After Corona pandemic these 25 shares of Sensex made investors rich tata motors tata steel fmgc got multibagger returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.