Gold Silver Price Today: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा भडका उडत असतानाच सोन्याचे भाव मात्र कमी होताना दिसत आहेत. आयबीजेएनं (IBJA) जारी केलेल्या दरांनुसार, आज ५ मार्च रोजी 'गोल्ड ९९९' चे भाव (जीएसटीशिवाय) बुधवारच्या बंद भावाच्या तुलनेत २६९८ रुपये प्रति १० ग्रॅमनं स्वस्त होऊन १,५९,८५० रुपयांवर आलेत. या दरांनुसार, आता सोनं सराफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापेक्षा केवळ १६,२७१ रुपयांनी स्वस्त राहिलंय. जीएसटीसह सोन्याचा भाव आज १,६४,६४५ रुपयांवर पोहोचला आहे.
१८ आणि २२ कॅरेटचे दर
२२ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह १,५०,८१५ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह १,२३,४८४ रुपयांवर पोहोचला आहे. माहितीसाठी, आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते; एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजेच्या आसपास दर जाहीर केले जातात.
चांदीही जोरदार आपटली
आयबीजेए दरांनुसार, आज, गुरुवार, ५ मार्च रोजी चांदीचा दर जीएसटीशिवाय २,५७,८०० रुपये प्रति किलोनं उघडला, ज्यामध्ये १३,५४७ रुपयांची लक्षणीय घसरण झाली. जीएसटीसह, ती २.६५ लाख रुपयांवर आली आहे. २९ जानेवारी २०२६ रोजीच्या ३८५,९३३ रुपये प्रति किलो या त्याच्या सर्वकालीन सराफा बाजारातील उच्चांकाच्या तुलनेत, चांदी सध्या त्याच्या उच्चांकी स्तरापेक्षा १,२८,१३३ रुपये प्रति किलो स्वस्त आहे.
