lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदाच्या पावसाळ्यात कपडे धुवायचं काम वाटणार नाही बोअरिंग; पाहू या, क्रोमा वॉशिंग मशिनची नवी रेंज का ठरेल अचूक निवड!  

यंदाच्या पावसाळ्यात कपडे धुवायचं काम वाटणार नाही बोअरिंग; पाहू या, क्रोमा वॉशिंग मशिनची नवी रेंज का ठरेल अचूक निवड!  

चांगली वॉशिंग मशीन कुठली बरं, वीजही वाचवेल आणि वेळ आणि पाणीसुद्धा. क्रोमाने तुमच्या या गरजा ओळखून फुली ऑटोमॅटिक टॉप लोड, फ्रंट लोड आणि सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड या श्रेणींमध्ये क्रोमा वॉशिंग मशीन लाँच केल्या आहेत. चला पाहूयात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 01:20 PM2022-08-03T13:20:27+5:302022-08-03T13:26:29+5:30

चांगली वॉशिंग मशीन कुठली बरं, वीजही वाचवेल आणि वेळ आणि पाणीसुद्धा. क्रोमाने तुमच्या या गरजा ओळखून फुली ऑटोमॅटिक टॉप लोड, फ्रंट लोड आणि सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड या श्रेणींमध्ये क्रोमा वॉशिंग मशीन लाँच केल्या आहेत. चला पाहूयात...

ADV: This monsoon season, washing clothes won’t be a chore anymore! Here’s how the new range of Croma Washing Machines will make for a perfect buy | यंदाच्या पावसाळ्यात कपडे धुवायचं काम वाटणार नाही बोअरिंग; पाहू या, क्रोमा वॉशिंग मशिनची नवी रेंज का ठरेल अचूक निवड!  

यंदाच्या पावसाळ्यात कपडे धुवायचं काम वाटणार नाही बोअरिंग; पाहू या, क्रोमा वॉशिंग मशिनची नवी रेंज का ठरेल अचूक निवड!  

पावसाळा आला की कपडे सुकता सुकत नाहीत. त्यातच पावसातून आल्यानंतर भिजलेले कपडे वेगळेच. हे सारे कपडे हाताने धुवायचे असतील तर, विचारच केलेला नको. त्यापेक्षा वॉशिंग मशीनच घेतली तर किती मस्त. पावसाळा, हिवाळा की उन्हाळा साऱ्याच ऋतूंची कटकट संपेल नाही का. पण या साठी चांगली वॉशिंग मशीन कुठली बरं, वीजही वाचवेल आणि वेळ आणि पाणीसुद्धा. क्रोमाने तुमच्या या गरजा ओळखून फुली ऑटोमॅटिक टॉप लोड, फ्रंट लोड आणि सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड या श्रेणींमध्ये क्रोमा वॉशिंग मशीन लाँच केल्या आहेत. चला पाहूयात...


फुल्ली ऑटोमॅटिक श्रेणी....

1. फुल्ली ऑटोमॅटिक - टॉप लोड

या श्रेणीतील वॉशिंग मशीन 7/7.5/8Kg क्षमतेमध्ये येतात. मशिनमध्ये 10 - 12 फॅब्रिक केअर वॉश प्रोग्राम्स आहेत ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि रिंकल-फ्री सेटिंग्ज आहेत. स्टँडर्ड, एक्सप्रेस वॉश, जेंटल, जीन्स, इको क्लीन, लिनेन, स्पिन ड्राय, ड्रम क्लीन, रिन्स, वॉश+रिन्स, वॉश+स्पिन, रिन्स+स्पिन, स्पिन ओन्ली प्रोग्राम यापैकी तुम्ही हवा तो निवडू शकता. अ‍ॅक्टीव्ह बबल वॉश टेक्नॉलॉजी जी डाग, मळ काढून टाकण्यासाठी साबणाचे बुडबुडे तयार करते, साबण विरघळवते. 

अँटी-बॅक्टेरियल शील्ड जंतूमुक्त कपडे देते. मॅजिक स्पिन रिन्स वैशिष्ट्य तुम्हाला रिन्सिंग प्रक्रियेदरम्यान पाणी वाचवण्यास मदत करते. पाण्याच्या प्रवाहाबरोबरच, ड्रमच्या आत वेगवेगळ्या ठिकाणी दोन अतिरिक्त शॉवर ठेवलेले आहेत, जे कमी प्रमाणात पाणी वापरून कपड्यांमधून डिटर्जंट काढून टाकतील. इझी जेट पल्सेटर कपड्यांना विस्कटवते आणि सर्व बाजुंनी धुण्यास मदत करते. यामुळे सुरकुत्या पडत नाहीत. व पाणी देखील सहजपणे निघून जाते. 

सच्छिद्र स्टेनलेस स्टीलचा ड्रम देण्यात आला आहे. त्याद्वारे कपडे घासले, घुसळले जातात. यामुळे कपड्यांच्या धाग्यांतील छिद्रांमध्ये लपलेली मळ बाहेर पडते. वन टचमध्ये कपड्याच्या वजनानुसार योग्य प्रोग्राम आणि पाणी निवडले जाते. याचबरोबर 24-तास डिले वैशिष्ट्य वापरकर्त्यांना 24 तासांपर्यंत धुण्याची वेळ शेड्यूल करण्यास अनुमती देते. म्हणजे ते रात्री कपडे मशीनमध्ये टाकून त्यांच्या वेळेप्रमाणे ते धुवू शकतात. बाहेर जाणाऱ्या गृहीणींसाठी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हे अत्यंत उपयुक्त फिचर आहे. 

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रोमाची वॉशिंग मशीन पाण्याचा दाब कमी असला तरी देखील उत्तमरित्या कपडे धुते. बंगला असो की फ्लॅट सिस्टिम अनेक घरांमध्ये पाण्याचा दाब कमी असतो. क्रोमा वॉशिंग मशिन घरी आणली की 0.001Mpa-0.002 MPa एवढे जरी पाण्याचे प्रेशर असले तरी तुम्ही निवांत होऊ शकता. ड्रम क्लीन आणि एअर-ड्राय सायकल टबची स्वच्छता होते. 8KG प्रकारात सुरक्षित ऑपरेशनसाठी मागे पॅनेल डिझाइन आहे. त्याच प्रकारात सॉफ्ट क्लोजर लिड आहे आणि ते सोक, वॉश, रिन्स आणि स्पिन प्रक्रियेसह सुसज्ज आहे.

क्रोमाच्या अन्य मशीनमध्ये थंड आणि गरम पाण्याच्या प्रवाहाची देखील सोय आहे. ८ किलोच्या मशीनमध्ये तर आतमध्येच गरम पाणी मिळते. म्हणजे इन बिल्ट हिटर आहे. तुम्ही गरम पाणी की थंड पाणी याची निवडही करू शकता. या मशीन BEE 5-स्टार रेटिंगच्या असल्याने वीजही वाचते. क्रोमाच्या वॉशिंग मशीन मेड इन इंडिया आहेत. या मशीनला 2 वर्षांची वॉरंटी आणि 10 वर्षांची मोटर वॉरंटी आहे.

2. फ्रंट लोड वॉशिंग मशीन

घरामध्ये कमी जागा असल्यास फ्रंट लोड मशीन खुप सोईची आणि योग्य पर्याय आहे. कमी जागेत ही मशीन ड्रायरसोबतही जोडता येते. उपलब्ध असलेल्या वॉशिंग मशीनच्या प्रकारांमध्ये या मशीन सर्वात कार्यक्षम मानल्या जातात.
 क्रोमा फ्रंट लोड वॉशिंग मशीन ७.५/८.५ किलो क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. ही मशीन 22 वॉश प्रोग्रामसह येते. या मशीनला इतरांपेक्षा वेगळे वैशिष्ट्य देणारी म्हणजे BLDC इन्व्हर्टर मोटर. ही मोटर कमी आवाज करते. दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मोटरचे आयुष्य इतरांपेक्षा अधिक आहे. ही मोटर लोडच्या विरुद्ध फिरत असल्याने ती कमी वीज वापरते. स्पेशल माय सायकल प्रोग्राम वापरून वापरकर्ते त्यांची सेटिंग्ज कायमची सेट करू शकतात. अ‍ॅड गारमेंट फिचरद्वारे तुम्ही मशीनमध्ये मध्येच कपडे टाकू शकता. या मशीनला डिजिटल एलईडी डिस्प्ले येतो, याद्वारे युजरला मशीन वापरणे सोपे जाते. क्रोम प्लेटिंगसह असलेला सुपर डोअर एक प्रिमिअम लूक देतो. 1400 RPM वेगाने ड्रम फिरत असल्याने कपडे वेगाने ड्राय करण्याचे काम हे मशीन करते. यामुळे वेळही वाचतो.

क्रोमा फ्रंट लोड वॉशिंग मशीन ७.५/८.५ किलो क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. या मशीनला 2 वर्षांची वॉरंटी आणि 10 वर्षांची मोटर वॉरंटी आहे.

सेमी ऑटोमॅटिक श्रेणी

१. टॉप लोड वॉशिंग मशीन (सेमी-ऑटोमॅटिक)

अर्ध-स्वयंचलित म्हणजेच सेमी ऑटोमॅटीक टॉप लोड मशीन 6.5Kg क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. हे जेंटल आणि हेवी सारख्या 2 फॅब्रिक केअर वॉश प्रोग्राम्ससह येते, ज्यामध्ये तुम्ही वॉशसाठी ज्या प्रकारचे कपडे घालत आहात त्यानुसार तुम्ही योग्य वॉशिंग मोड निवडू शकता. हे दोन्ही मोड केवळ प्रभावीपणे कपडे धुणेच करत नाहीत तर कपडे खराब होण्यापासून देखील वाचवतात. स्पायरल पल्सेटर वॉश सायकल दरम्यान कपडे घुसळण्यासाठी टबमधील पाण्याचा प्रवाह तयार केला जातो. यामुळे कपडे मागे-पुढे असे फिरवले जातात, यातून कपडे चांगल्या प्रकारे धुतले जातात. ही मशीन इझी वॉश ट्रेसह बकेट लीडसोबत येते. हे बकेट लीड साबन पावडर साठविण्याठी आणि अस्वच्छ कपडे धुण्यासाठी वापरता येते. कपड्यावरील मळ घालविण्यासाठी कॉलर स्क्रबर देखील यामध्ये उपलब्ध आहे. यामशीनला खाली चाके देखील आहेत, ती तुम्हाला घरात कुठेही या मशीनची ने आण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अ‍ॅक्टिव्ह सोक वैशिष्ट्य तुमच्या कपड्यांच्या स्वच्छतेचा अतिरिक्त डोस देते. भिजवण्याचे काम सुरु असताना, मोटर अधूनमधून एका मिनिटासाठी कपडे घुसळवते. यामुळे कपड्यातून निघालेला मळ एकाच ठिकाणी जमा होणार नाही याची खात्री मिळते. रस्ट प्रूफ पॉलीप्रॉपिलीन बॉडी गंज प्रतिरोधक आहे. यामुळे टिकाऊपणा आणि देखभाल सुलभतेची खात्री मिळते. या मेड इन इंडिया वॉशिंग मशीनवर तुम्हाला 2 वर्षांची वॉरंटी आणि मोटरवर 5 वर्षांची वॉरंटी मिळेल.

वॉशिंग मशिन खरेदी करण्‍याचा विचार करत असल्यास क्रोमाच्या वॉशिंग मशीन सर्वात कमी वीज, पाणी वापरून तुम्हाला हवे तसे स्वच्छ कपडे धुवून देतात. यामुळे खरेदीचा विचार असल्यास या लिंकवर क्लिक करा...Croma Washing Machines

Web Title: ADV: This monsoon season, washing clothes won’t be a chore anymore! Here’s how the new range of Croma Washing Machines will make for a perfect buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा