Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या

Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या

Aditya Infotech IPO: ब्लॉकबस्टर सबस्क्रिप्शननंतर या कंपनीचे शेअर्स मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स त्याच्या ₹६७५ च्या इश्यू प्राईजपेक्षा ५१% च्या प्रीमियमवर लिस्ट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:48 IST2025-08-05T11:48:44+5:302025-08-05T11:48:44+5:30

Aditya Infotech IPO: ब्लॉकबस्टर सबस्क्रिप्शननंतर या कंपनीचे शेअर्स मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स त्याच्या ₹६७५ च्या इश्यू प्राईजपेक्षा ५१% च्या प्रीमियमवर लिस्ट झाले.

Aditya Infotech IPO listing at 51 percent premium Investors huge profit buy stocks after listing | Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या

Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या

Aditya Infotech IPO: ब्लॉकबस्टर सबस्क्रिप्शननंतर, आदित्य इन्फोटेकचे शेअर्स मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स त्याच्या ₹६७५ च्या इश्यू प्राईजपेक्षा ५१% च्या प्रीमियमवर लिस्ट झाले. बीएसई वर, स्टॉक ५०.८% च्या प्रीमियमसह ₹१,०१८ वर लिस्ट झाला, तर एनएसई वर तो ५०.३७% च्या प्रीमियमसह ₹१,०१५ वर लिस्ट झाला. लिस्ट झाल्यानंतरही, स्टॉक ६% पर्यंत वाढला आणि १०९५ रुपयांवर पोहोचला.

व्हिडीओ सिक्युरिटी आणि सर्व्हिलान्स उत्पादनं प्रदान करणारी सीपी प्लस कंपनी, आदित्य इन्फोटेक लिमिटेडचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. दरम्यान, कंपनीच्या आयपीओला जबरदस्त लिस्टिंग मिळालं. कंपनीनं मंगळवारी आयपीओ उघडण्याच्या एक दिवस आधी अँकर गुंतवणूकदारांकडून ५८२ कोटी रुपये उभारले. या आयपीओद्वारे कंपनीने एकूण १,३०० कोटी रुपये उभारण्याची तयारी केली होती. यामध्ये ५०० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले, तर ८०० कोटी रुपये ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) उभारण्यात आले.

अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी

अधिक माहिती काय?

कंपनीनं आयपीओसाठी प्राईज बँड ६४० ते ६७५ रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला होता. आयपीओ बुक करण्यासाठी, किमान २२ शेअर्ससाठी गुंतवणूक करावी लागली, ज्यासाठी १४,८५० रुपये खर्च करावे लागणार होते. त्याच वेळी, २२ च्या पटीत अधिक शेअर्ससाठी बोली लावता येणार होती.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, आयपीद्वारे उभारलेल्या निधीतून ३७५ कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. कंपनीनं दाखल केलेल्या ड्राफ्ट पेपर्सनुसार, मार्च २०२४ पर्यंत कंपनीवर ४०५ कोटी रुपयांचे कर्ज होतं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Aditya Infotech IPO listing at 51 percent premium Investors huge profit buy stocks after listing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.