भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या क्षेत्रावर अदानी समूहाचीही नजर आहे. अदानीसमूह आधीपासूनच अनेक एयरपोर्ट्स सांभाळत आहे. आत याच क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासंदर्भात सोवारी माहिती देताना आपण एअक्राफ्ट मेंटनन्स, रिपेअर आणि देखभाल (MRO) करणारी कंपनी एअर वर्क्सचे अधिग्रहण करणार आहोत असे म्हटले आहे. यासाठी अदानी समूह 400 कोटी रुपये मोजणार आहे.
अदानी समूहाने यासंदर्भात एका निवेदनात म्हटले आहे, "अदानी डिफेंस सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (एडीएसटीएल) देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी एमआरओ कंपनी एअर वर्क्समध्ये 85.8 टक्के वाटा मिळवण्यासाठी शेअर खरेदीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे." एअर वर्क्स देशातील अनेक बागात कार्यरत आहे. देशातील 35 शहरांत पसरलेले कामकाज आणि 1,300 हून अधिक कर्मचारी असलेल्या एअर वर्क्सला फिक्स्ड-विंग आणि रोटरी-विंग दोन्ही प्रकारच्या विमानांची ‘सर्विसिंग’ करते. एअर वर्क्सची स्थापना 1951 मध्ये झाली होती. हिची स्थापना मेनन कुटुंबाने केली होती.
ही कंपनी इंडिगो, गो एअर, विस्तारासह डझनावर देशी आणि परदेशी कंपन्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करते. तसेच ही कंपनी डिफेंस एव्हिएशनलाही सपोर्ट करते. एअर वर्क्स इंडियन एअरफोर्स 737 व्हीव्हीआयपी फ्लीटलाही अपली सर्व्हिस प्रोव्हाइड करते. महत्वाचे म्हणजे, अदानी समूह सध्या एकूण 7 एअरपोर्टचे संचालन करत आहे.