Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड

अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड

आज बीएसईवर हा शेअर ४५६.३५ रुपयांवर खुला झाला आणि ५ टक्क्यांच्या तेजीसह त्याने व्यवहारादरम्यान ४९०.७० रुपयांचा इंट्रा-डे उच्चांक गाठला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:42 IST2025-12-26T16:41:47+5:302025-12-26T16:42:14+5:30

आज बीएसईवर हा शेअर ४५६.३५ रुपयांवर खुला झाला आणि ५ टक्क्यांच्या तेजीसह त्याने व्यवहारादरम्यान ४९०.७० रुपयांचा इंट्रा-डे उच्चांक गाठला.

Adani Group received an order worth rs 3400 crore, the share rose by 5 Percent in a flash Now people are rushing to buy | अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड

अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड

शेअर बाजारात आजचा दिवस दिलीप बिल्डकॉन कंपनीसाठी खास ठरला. कंपनीला दोन मोठे वर्क ऑर्डर मिळाल्याचे वृत्त येताच, हा शेअर खरेदी करण्यासाठी बाजारात गुंतवणूकदारांची मोठी झुंबड उडाली. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. आज बीएसईवर हा शेअर ४५६.३५ रुपयांवर खुला झाला आणि ५ टक्क्यांच्या तेजीसह त्याने व्यवहारादरम्यान ४९०.७० रुपयांचा इंट्रा-डे उच्चांक गाठला.

भोपाळमधील या कंपनीला शुक्रवारी एक्सचेन्जने दिलेल्या माहितीनुसार, 'अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड'कडून कंपनीला सुलतानगंज आणि भागलपूरला जोडणाऱ्या 'गंगा पथ' निर्मितीचे काम मिळाले आहे. ३४०० कोटी रुपयांच्या या रस्ते प्रकल्पासाठी ४२ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

याशिवाय कंपनीला 'आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सलटन्सी लिमिटेड'कडून कर्नाटकच्या बेळगाव येथे ४०० किलोवॅटच्या सबस्टेशन उभारणीचे काम मिळाले आहे. १८५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम २४ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. अर्थात कंपनीला अदानी समूह आणि आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सलटन्सी लिमिटेड'कडून एकूण ५२५० कोटी रुपयांची कामे मिळाली आहेत:

अशी आहे शेअरची कामगिरी - 
गेल्या एका वर्षाचा विचार करता, या शेअरने एका वर्षात १५ टक्क्यांचा परतावा दिला असून, या काळात सेन्सेक्समध्ये केवळ ३.३९ टक्क्यांची वाढ झाली. तसेच ६ महिन्यांत या शेअरचा भाव ३४ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, आता या नवीन कंत्राटानंतर, कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत हा शेअर ८४ टक्क्यांनी वधारला आहे. 

Web Title: Adani Group received an order worth rs 3400 crore, the share rose by 5 Percent in a flash Now people are rushing to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.