lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ACC, Ambuja Cement on Sale: सिमेंट उद्योग हादरला! ACC, अंबुजा कंपन्या विक्रीला; जगातील सर्वात मोठी कंपनी भारत सोडण्याच्या तयारीत

ACC, Ambuja Cement on Sale: सिमेंट उद्योग हादरला! ACC, अंबुजा कंपन्या विक्रीला; जगातील सर्वात मोठी कंपनी भारत सोडण्याच्या तयारीत

ACC, Ambuja Cement on Sale: जो कोणी या दोन्ही कंपन्या खरेदी करेल तो भारतीय बाजारात अचानक दबदबा निर्माण करेल. नंबर दोनवर येऊन पोहोचेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 01:42 PM2022-04-14T13:42:10+5:302022-04-14T13:43:10+5:30

ACC, Ambuja Cement on Sale: जो कोणी या दोन्ही कंपन्या खरेदी करेल तो भारतीय बाजारात अचानक दबदबा निर्माण करेल. नंबर दोनवर येऊन पोहोचेल.

ACC, Ambuja Cement on Sale: Cement industry shakes! ACC, Ambuja holding world's largest company Holcim Group is preparing to Exit India | ACC, Ambuja Cement on Sale: सिमेंट उद्योग हादरला! ACC, अंबुजा कंपन्या विक्रीला; जगातील सर्वात मोठी कंपनी भारत सोडण्याच्या तयारीत

ACC, Ambuja Cement on Sale: सिमेंट उद्योग हादरला! ACC, अंबुजा कंपन्या विक्रीला; जगातील सर्वात मोठी कंपनी भारत सोडण्याच्या तयारीत

भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे, रस्ते, इमारती आदींची बांधकामे सुरु असताना सिमेंट उद्योग जगतात मोठी घडामोड घडू लागली आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी होल्कीम ग्रुपने (Holcim Group) भारतातील १७ वर्षांत उभारलेला डोलारा गुंडाळण्याची तयारी सुरु केली आहे. 

या कंपनीने कोअर मार्केटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ग्लोबल स्ट्रॅटेजी तयार केली आहे. यानुसार भारतातून बाहेर पडणे हे या नितीचाच भाग आहे. या विषयाशी संबंधीत सूत्रांनी सांगितले की, अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड या दोन्ही भारतात लिस्टेड कंपन्यांना होल्कीम ग्रुपने विक्रीसाठी ठेवले आहे. 

होल्कीम ग्रुप आपला भारतातील व्य़वसाय विकण्यासाठी जेएसड्ब्लू आणि अदानी ग्रुपसह अन्य कंपन्यांशी चर्चा करत आहे. जेएसडब्ल्यू (JSW) आणि अदानी (Adani Group) यांनी काही काळापूर्वीच सिमेंट उद्योगात एन्ट्री केली आहे. दोन्ही उद्योग समुहांनी या उद्योगात मोठी झेप घेण्याची तयारी केली आहे. मात्र, असे असले तरी श्री सिमेंटसारख्या कंपन्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे. 

भारतीय सिमेंट बाजारात आदित्य बिर्ला यांची अल्ट्राटेक कंपनी सर्वात मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेक दरवर्षाला 117 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन घेऊ शकते. Holcim Group च्या दोन्ही एसीसी आणि अंबुजा सिमेंटची उत्पादन क्षमता ६६ दशलक्ष टन आहे. जो कोणी या दोन्ही कंपन्या खरेदी करेल तो भारतीय बाजारात अचानक दबदबा निर्माण करेल. नंबर दोनवर येऊन पोहोचेल. भारतीय बाजारावर लक्ष ठेवून असलेल्या परदेशी कंपन्यांकडेही मूळ कंपनी प्रस्ताव घेऊन गेली आहे. 

Holcim बाबत थोडेसे...
Holcim ही मूळची स्वत्झर्लंडची कंपनी आहे. तिला फ्रान्सच्या बड्या कंपनीने Lafarge विकत घेतले आणि विलिनीकरण केले. यामुळे या कंपनीचे नाव LafargeHolcim असे झाले आणि जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली. या कंपनीने युरोपसह आशियाच्या बाजारातील कंपन्या ताब्यात घेण्यासाठी कायद्यानुसार काही मालमत्ता विकल्या. आशियाई बाजारातील कायद्यानुसार काही बदल करत Holcim Group अशा नावाने रिब्रँड करण्यात आले. Ambuja Cement मध्ये या कंपनीचे 63.1 टक्के समभाग आहेत. यापैकी अंबुजा सिमेंटचे एसीसी मध्ये ५० टक्के समभाग आहेत. या विक्री प्रकरणावर कंपनीने आम्ही अफवांवर बोलत नाही एवढेच उत्तर दिले आहे. 

Read in English

Web Title: ACC, Ambuja Cement on Sale: Cement industry shakes! ACC, Ambuja holding world's largest company Holcim Group is preparing to Exit India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Adaniअदानी