Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अबब... ८८% पगारवाढ, इन्फोसेसचे सीईओ सलिल पारेख मालामाल

अबब... ८८% पगारवाढ, इन्फोसेसचे सीईओ सलिल पारेख मालामाल

पगारात वाढ ८८ टक्के इतकी करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 06:42 IST2022-05-27T06:41:56+5:302022-05-27T06:42:40+5:30

पगारात वाढ ८८ टक्के इतकी करण्यात आली आहे.

Abb ... 88% salary hike, Infosys CEO Salil Parekh Malamal | अबब... ८८% पगारवाढ, इन्फोसेसचे सीईओ सलिल पारेख मालामाल

अबब... ८८% पगारवाढ, इन्फोसेसचे सीईओ सलिल पारेख मालामाल

नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे फेरनिवड झालेले सीईओ सलिल पारेख यांच्या पगारात दणदणीत वाढ करण्यात आली आहे. सलिल पारेख यांचे पगार पॅकेज थेट ४२.५० कोटी रुपयांवरून ७९.७५ कोटी रुपये झाले असून, पगारात वाढ ८८ टक्के इतकी करण्यात आली आहे.

पारेख २०१८ पासून इन्फोसिसमध्ये...

पारेख यांनी जानेवारी २०१८ मध्ये इन्फोसिसचे  सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी कॅपजेमिनीमध्ये २५ वर्षे काम केले आहे. 

कामाचे दाम...
सीईओच्या पगारात वाढ करताना सॉफ्टवेअर कंपनीने सांगितले की, सलिल यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसने मोठी प्रगती केली आहे.  पारेख यांच्या पगारवाढीचा हा निर्णय त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवण्याच्या घोषणेनंतर घेण्यात आला आहे. 

सीईओंचे वार्षिक वेतन
सलिल पारेख (इन्फोसिस) ७९.७५ कोटी
थियरी डेलापोर्ट (विप्रो) 
६४.३४कोटी
सी. विजयकुमार (एचसीएल टेक) ३२.२१ कोटी
राजेश गोपीनाथन (टीसीएस) 
२५.७६ कोटी
सी. पी. गुरनानी (टेक महिंद्रा) २२कोटी

 

Web Title: Abb ... 88% salary hike, Infosys CEO Salil Parekh Malamal