Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?

Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?

Raghav Chadha Net Worth:  आम आदमी पार्टीमधील (AAP) अंतर्गत हालचाली आता उघडपणे समोर आल्या आहेत. राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आलंय. पाहूया राघव चड्ढा आणि त्यांची पत्नी परिणीती यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:46 IST2026-04-03T15:42:27+5:302026-04-03T15:46:08+5:30

Raghav Chadha Net Worth:  आम आदमी पार्टीमधील (AAP) अंतर्गत हालचाली आता उघडपणे समोर आल्या आहेत. राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आलंय. पाहूया राघव चड्ढा आणि त्यांची पत्नी परिणीती यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण आहे?

aap mp Raghav Chadha or Parineeti Chopra Who is the richest of the two What is the net worth | Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?

Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?

Raghav Chadha Net Worth:  आम आदमी पार्टीमधील (AAP) अंतर्गत हालचाली आता उघडपणे समोर आल्या आहेत. राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आलंय. पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून विनंती केली आहे की, भविष्यात त्यांना पक्षाच्या कोट्यातून बोलण्यासाठी वेळ दिला जाऊ नये. राघव चड्ढा आणि पक्ष नेतृत्व यांच्यात बिनसल्याच्या बातम्या सातत्यानं येत असतानाच हा मोठा निर्णय घेण्यात आलाय.

राघव चड्ढा यांची गणना आम आदमी पार्टीच्या अत्यंत सुशिक्षित आणि तल्लख नेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलं असून, दीर्घकाळापासून ते अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात मद्य गैरव्यवहार प्रकरणात केजरीवाल यांना क्लीन चिट मिळाल्यानंतरही चड्ढा यांनी कोणतीही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर पक्षांतर्गत त्यांच्या संबंधांबाबतचे प्रश्न अधिक गडद झाले.

खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी

राघव चड्ढा यांची संपत्ती किती?

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये राघव चड्ढा यांच्या संपत्तीबद्दलही उत्सुकता वाढली आहे. विविध रिपोर्ट्सनुसार, राघव चड्ढा यांची एकूण नेटवर्थ सुमारे ५० लाख रुपये आहे. त्यांच्याकडे अंदाजे ३६ लाख रुपयांचं एक घर आहे. याशिवाय, त्यांच्याकडे मारुती सुझुकी डिझायर ही कार असून ४.९४ लाख रुपयांचे सोनं आणि सुमारे ६ लाख रुपयांचे बाँड्स व शेअर्स आहेत.

परिणीती चोप्राची संपत्ती आणि कमाई

दुसरीकडे, राघव चड्ढा यांची पत्नी आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा हीचं आर्थिक प्रोफाइल खूप मोठं आहे. तिची एकूण संपत्ती सुमारे ७४ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. मुंबईतील वांद्रे भागात तिचं एक घर असून ज्याची किंमत सुमारे २२ कोटी रुपये आहे. तिच्याकडे लक्झरी कारचं मोठं कलेक्शन असून, त्यात १.३० कोटी रुपयांची रेंज रोव्हर वोग, ४३.१९ लाख रुपयांची ऑडी क्यू४ आणि ६९.२७ लाख रुपयांची ऑडी क्यू७ यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्राची वार्षिक कमाई देखील मोठी राहिली असून एका टप्प्यावर तिनं वर्षाला ५.३६ कोटी रुपयांपर्यंत कमाई केलीये. तिनं 'फोर्ब्स इंडिया'च्या सेलिब्रिटी १०० यादीतही स्थान मिळवलं होतं.

दोघांच्या एकत्रित संपत्तीचं गणित

जर राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची संपत्ती एकत्रित करून पाहिली, तर या दाम्पत्याची एकूण नेटवर्थ सुमारे ७४.५ कोटी रुपये होते. यामध्ये सर्वात मोठा हिस्सा परिणीती चोप्राचा आहे, तर राघव चड्ढा यांचा वाटा त्या तुलनेत अत्यंत कमी आहे.

Web Title : राघव चड्ढा बनाम परिणीती चोपड़ा: कौन है अधिक धनी? नेट वर्थ?

Web Summary : राघव चड्ढा राजनीतिक झटकों का सामना कर रहे हैं। उनकी कुल संपत्ति 50 लाख रुपये है, जबकि परिणीति चोपड़ा की कुल संपत्ति 74 करोड़ रुपये है, जिसमें मुंबई में एक घर और लग्जरी कारें शामिल हैं। दोनों की कुल संपत्ति 74.5 करोड़ रुपये है।

Web Title : Raghav Chadha vs Parineeti Chopra: Who is richer? Net worth?

Web Summary : Raghav Chadha faces political setbacks amid net worth buzz. His ₹50 lakh contrasts sharply with Parineeti Chopra's ₹74 crore fortune, including a Mumbai home and luxury cars. Combined, their net worth is ₹74.5 crore.