Lokmat Money > बिझनेस न्यूज > UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

Aadhaar : डेटा सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या दिशेने UIDAI चे हे पाऊल एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यापुढे आधार कार्डसाठी नियम बदलण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:36 IST2025-07-04T15:14:27+5:302025-07-04T15:36:57+5:30

Aadhaar : डेटा सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या दिशेने UIDAI चे हे पाऊल एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यापुढे आधार कार्डसाठी नियम बदलण्यात येणार आहे.

aadhaar uidai updating data on aadhaar unique identification new guidelines | UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

Aadhaar : जर तुम्हाला चुकून दोन वेगवेगळे आधार क्रमांक मिळाले असतील, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आधार जारी करणारी संस्था UIDAI ने यावर आता स्पष्ट नियम बनवले आहेत. भविष्यात असा गोंधळ किंवा गैरवापर टाळण्यासाठी UIDAI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामुळे 'एक व्यक्ती - एक आधार' हे धोरण आणखी मजबूत होईल आणि ओळखीची फसवणूक रोखता येईल. हे UIDAI चे पाऊल डेटा सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

UIDAI च्या नवीन नियमांमध्ये काय आहे?
ज्या आधार क्रमांकावर तुमचा संपूर्ण बायोमेट्रिक (उदा. फिंगरप्रिंट, डोळा स्कॅनिंग) तपशील असेल, तोच आधार क्रमांक वैध मानला जाईल.
जर तुमच्या दोन्ही आधार क्रमांकांपैकी कोणत्याही एका क्रमांकातील बायोमेट्रिक माहिती अपूर्ण असेल, तर सर्वात आधी जारी केलेला आधार क्रमांक वैध मानला जाईल.
दुसरा आधार क्रमांक अवैध घोषित केला जाईल, जेणेकरून एकाच व्यक्तीच्या नावाने दोन वेगवेगळ्या ओळखी तयार होणार नाहीत.

हे नवीन नियम का आले?
गेल्या काही काळापासून UIDAI ला एकाच व्यक्तीच्या नावाने दोन आधार कार्ड जारी झाल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. यामुळे ओळखीबाबत गोंधळ निर्माण होत होता आणि सरकारी योजनांचा गैरवापर होण्याची शक्यताही वाढली होती. त्यामुळे, आता कोणता आधार वैध मानावा आणि कोणता रद्द करावा, हे ठरवण्यासाठी बायोमेट्रिक डेटाला आधार मानले जाईल.

तुमच्याकडे दोन आधार क्रमांक असतील तर काय कराल?
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नावावर दोन आधार क्रमांक जारी झाले आहेत, तर ताबडतोब तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्राशी संपर्क साधा. कोणता आधार क्रमांक वैध ठेवायचा आणि कोणता रद्द करायचा, हे UIDAI ठरवेल.

कागदपत्रांची नवीन यादीही लागू
UIDAI ने आधार बनवण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादीही अपडेट केली आहे. हे बदल लहान मुले, परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय (NRIs) आणि ट्रान्सजेंडर समुदाय अशा वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने लागू होतील.

आता कोणते कागदपत्रे वैध मानली जातील?

  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट (भारतीय/विदेशी)
  • मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड यांसारखे ओळखपत्र
  • वीज, पाणी, गॅस, टेलिफोन बिल यांसारखे पत्त्याचे पुरावे
  • शालेय प्रमाणपत्र आणि सरकारी प्रमाणपत्र

मुलांच्या बाबतीत: जर मूल ५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल, तर त्याच्या/तिच्या आधार नोंदणीसाठी कुटुंब प्रमुखाचा आधार आवश्यक असेल.
परदेशी नागरिक आणि OCI (Overseas Citizen of India) कार्डधारकांसाठी: त्यांच्या आधारची वैधता व्हिसा किंवा प्रवास परवान्याच्या कालावधीपर्यंत असेल.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
जन्म प्रमाणपत्र आता अनेक प्रकरणांमध्ये (विशेषतः अनिवासी भारतीय आणि लहान मुलांसाठी) अनिवार्य करण्यात आले आहे.
नाव, जन्मतारीख किंवा लिंग बदलण्यासाठी देखील विशिष्ट कागदपत्रांची आवश्यकता असेल.
कोणताही दस्तऐवज तेव्हाच वैध मानला जाईल जेव्हा तो सध्या वैध असेल, त्या व्यक्तीच्या नावावर असेल आणि त्यात नमूद केलेली माहिती पडताळणीयोग्य असेल.

हे बदल आधार डेटा अधिक सुरक्षित, एकसमान आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. यामुळे बनावट किंवा डुप्लिकेट आधार क्रमांक काढून टाकता येतील आणि लोकांना त्यांचे रेकॉर्ड दुरुस्त करण्यात अधिक सोय होईल. सोप्या भाषेत सांगायचे तर, आता एकाच व्यक्तीचे दोन आधार क्रमांक वैध राहणार नाहीत आणि आधारसाठी वैध कागदपत्रांची यादी अद्ययावत केली आहे.

वाचा - प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

जर तुम्ही कधी दोन आधार कार्ड बनवले असतील किंवा तुमच्या माहितीत काही बदल झाला असेल, तर ते लगेच दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. हे काम UIDAI वेबसाइटला भेट देऊन किंवा जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन करता येते.

Web Title: aadhaar uidai updating data on aadhaar unique identification new guidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.