lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तारीख जवळ येतेय...! तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करा, अन्यथा...

तारीख जवळ येतेय...! तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करा, अन्यथा...

जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुने असेल आणि एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 07:20 PM2023-05-30T19:20:29+5:302023-05-30T19:21:27+5:30

जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुने असेल आणि एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागेल.

aadhaar card update free of cost uidai offer service last date 14 june 2023 | तारीख जवळ येतेय...! तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करा, अन्यथा...

तारीख जवळ येतेय...! तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करा, अन्यथा...

नवी दिल्ली : आधार कार्ड अपडेट करणे (Aadhaar Card Update) पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर किंवा ऑनलाइन देखील अपडेट करू शकता. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुने असेल आणि एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागेल.

आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड अपडेट करणे (Aadhaar Card Update) पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर किंवा ऑनलाइन देखील अपडेट करू शकता. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुने असेल आणि एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागेल.

UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया सर्व प्रकारच्या सरकारी आणि इतर सेवांमध्ये वापरल्या जाणार्‍या आधार कार्डमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी एक विशेष सुविधा देत आहे.  दरम्यान, UIDAI ने नागरिकांना आपले आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची मोफत संधी दिली आहे. सहसा आधार कार्डची माहिती अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. 

दरम्यान, 14 जून 2023 पर्यंत आधार अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे आधार कार्डची माहिती विनामूल्य अपडेट केली जात आहे. दरम्यान, तुम्ही घरी बसून आधार कार्ड अपडेट करू शकता. ऑनलाइन आधार अपडेटसाठी तुम्हाला तुमचा आयडी प्रूफ आणि घराचा पत्ता अपलोड करावा लागेल. हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमचे डेमोग्राफिक डिटेल्स दुरुस्त करण्यात मदत करतील.

कसे करावे आधार अपडेट?
- तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि OTP टाकावा लागेल.
- आता डॉक्युमेंट अपडेटला सिलेक्ट करा आणि ते व्हेरिफाय करा.
- यानंतर तुम्हाला ड्रॉप लिस्टमध्ये तुमचा आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ स्कॅन करून अपलोड करावा लागेल.
- तुम्ही सबमिट वर क्लिक कराल, त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि आधार अपडेट फॉर्म सबमिट केला जाईल.
- रिक्वेस्ट नंबरद्वारे तुम्ही तुमच्या आधारचे स्टेटस जाणून घेऊ शकता.
- आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्ही तुमचे अपडेट केलेले आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

कधी भरावे लागेल अपडेट चार्ज?
तुम्हाला आधार अपडेटची मोफत सुविधा फक्त आधार पोर्टलवर मिळेल. जर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट केले तर तुम्हाला अपडेट चार्ज भरावे लागेल. आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये चार्ज भरावे लागेल.

Web Title: aadhaar card update free of cost uidai offer service last date 14 june 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.