Lokmat Money > बिझनेस न्यूज > ८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि भत्ते वाढतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:38 IST2025-05-19T15:27:56+5:302025-05-19T15:38:31+5:30

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि भत्ते वाढतील.

8th pay commission how much salary and pension will be increase | ८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. या आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. केवळ पगारच नाही, तर पेन्शन आणि भत्त्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

कधी लागू होणार आठवा वेतन आयोग?
आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होईल, याची निश्चित तारीख सरकारने अजून जाहीर केलेली नाही. पण जाणकारांच्या मते, हा आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतो. काही तज्ञांना यात थोडा उशीर होण्याची शक्यता वाटते आणि त्यामुळे १ एप्रिल २०२६ पासून तो लागू होण्याची शक्यता आहे.

साधारणपणे दर १० वर्षांनी वेतन आयोग नेमला जातो. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर २०२५ मध्ये संपत आहे. आठव्या वेतन आयोगाचा फायदा जवळपास ५० लाख सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

पगार कसा ठरणार?
आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एका खास 'फिटमेंट फॅक्टर'च्या आधारावर वाढवला जाईल. सध्या सातव्या वेतन आयोगात वेतन सुधारण्यासाठी २.५७ चा फिटमेंट फॅक्टर वापरला जातो. काही बातम्यांनुसार, सरकार आठव्या वेतन आयोगात १.९२ चा फॅक्टर ठेवू शकतं. तर काही बातम्यांमध्ये असा अंदाज आहे की सरकार किमान २.८६ चा जास्त फिटमेंट फॅक्टर निवडू शकतं.

वाचा - मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट

पगार किती वाढणार?
जर सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये ३ किंवा त्याहून अधिक वाढ केली, तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. अशा परिस्थितीत, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात १९,००० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ५१,४८० रुपये असेल. इतकंच नाही, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शनची रक्कमही २५,७४० रुपयांपर्यंत वाढू शकते. एकंदरीत, आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगले दिवस येणार आहेत, यात शंका नाही. आता फक्त या आयोगाच्या अंमलबजावणीच्या तारखेची प्रतीक्षा आहे.

Web Title: 8th pay commission how much salary and pension will be increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.