Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष

महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष

Pensioners DR Increase: आठव्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधीच आनंदाची बातमी येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:32 IST2026-02-06T15:30:13+5:302026-02-06T15:32:24+5:30

Pensioners DR Increase: आठव्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधीच आनंदाची बातमी येऊ शकते.

7th Pay Commission Central Govt Employees Likely to Get 2% DA Hike Before Holi | महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष

महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष

DA Hike 2026 : होळीच्या सणापूर्वीच केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी येण्याची चिन्हे आहेत. महागाईच्या झळा सोसणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारमहागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीत २ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. लेबर ब्युरोने जाहीर केलेल्या डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ पासून हा भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के होऊ शकतो.

६०% महागाई भत्त्याचे गणित काय?
डिसेंबर २०२५ चा 'ऑल इंडिया कंज्युमर प्राईस इंडेक्स' डेटा समोर आल्यानंतर हा अंदाज वर्तवला जात आहे. जरी याची अधिकृत घोषणा मार्च महिन्यात होणे अपेक्षित असले, तरी ही वाढ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या हातात वाढीव पगार आणि थकबाकी येण्याचा मार्ग मोकळा होईल.

२% वाढीनंतर पगारावर होणारा परिणाम (तक्ता):
तुमच्या मूळ वेतनानुसार पगार किती वाढेल, हे खालील तक्त्यावरून समजून घेता येईल.

मूळ वेतन (₹) ५८% DA सह एकूण वेतन (₹) ६०% DA सह एकूण वेतन (₹) मासिक वाढ (₹) 
२०,००० ३१,६०० ३२,००० ४०० 
३०,००० ४७,४०० ४८,००० ६००
४०,००० ६३,२०० ६४,००० ८०० 
५०,००० ७९,००० ८०,००० १,००० 
६०,००० ९४,८०० ९६,००० १,२२० 
८०,००० १,२६,४०० १,२८,००० १,६०० 
१,००,००० १,५८,००० १,६०,००० २,००० 


(टीप: हा केवळ महागाई भत्त्याचा हिशोब आहे, इतर भत्ते मूळ वेतनानुसार वेगळे असू शकतात.)

निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार 'होळी गिफ्ट'
कर्मचाऱ्यांप्रमाणेच देशातील लाखो पेन्शनधारकांसाठीही ही दिलासादायक बातमी आहे. महागाई सवलतीत (DR) २ टक्क्यांनी वाढ होणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पेन्शनमध्येही वाढ होईल. महागाईचा वाढता आलेख पाहता, ही वाढ सणासुदीच्या काळात खर्चासाठी मोठी मदत ठरेल.

वाचा - पैशाविना उद्योजक बनण्याचं स्वप्न सोडू नका! २० लाखांपर्यंत कर्ज मिळणे झाले सोपे; RBI चा मोठा निर्णय

DA वाढीचे नियम काय आहेत?
केंद्र सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा करते.

  • जानेवारी (ज्याची घोषणा मार्चच्या सुमारास होते)
  • जुलै (ज्याची घोषणा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होते)

हा भत्ता पूर्णपणे ग्राहकांच्या किंमत निर्देशांकावर आधारित असतो, ज्यामुळे वाढत्या महागाईनुसार कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यास मदत होते.

Web Title : महंगाई भत्ते में 2% की बढ़ोतरी संभव: केंद्र सरकार का निर्णय प्रतीक्षित।

Web Summary : केंद्र सरकार के कर्मचारियों को 2% महंगाई भत्ते की बढ़ोतरी मिल सकती है, जिससे जनवरी 2026 से यह 60% तक हो सकता है। उपभोक्ता मूल्य सूचकांक पर आधारित यह वृद्धि, कर्मचारियों और पेंशनभोगियों दोनों को लाभान्वित करते हुए, उच्च वेतन और बकाया का वादा करती है। आधिकारिक घोषणा मार्च में अपेक्षित।

Web Title : 2% DA hike likely: Central government decision awaited by employees.

Web Summary : Central government employees may receive a 2% DA hike, potentially raising it to 60% from January 2026. This increase, based on the Consumer Price Index, promises higher salaries and arrears, benefiting both employees and pensioners. Official announcement expected in March.