Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेतून ३७ लाख कोटींचं ४५८० टन सोनं गायब; उडाली एकच खळबळ, ट्रम्प, मस्क तपास करणार का?

अमेरिकेतून ३७ लाख कोटींचं ४५८० टन सोनं गायब; उडाली एकच खळबळ, ट्रम्प, मस्क तपास करणार का?

अब्जावधी डॉलर्सचं सोनं अमेरिकेतून गायब झालंय का? अमेरिकेकडे खरंच सोनं नाही का? सोशल मीडियावर ही चर्चा वेगानं पसरत आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनीही यात एन्ट्री घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:41 IST2025-02-18T16:40:20+5:302025-02-18T16:41:17+5:30

अब्जावधी डॉलर्सचं सोनं अमेरिकेतून गायब झालंय का? अमेरिकेकडे खरंच सोनं नाही का? सोशल मीडियावर ही चर्चा वेगानं पसरत आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनीही यात एन्ट्री घेतली आहे.

4580 tons of gold worth Rs 37 lakh crores disappeared from America will Trump Musk investigate | अमेरिकेतून ३७ लाख कोटींचं ४५८० टन सोनं गायब; उडाली एकच खळबळ, ट्रम्प, मस्क तपास करणार का?

अमेरिकेतून ३७ लाख कोटींचं ४५८० टन सोनं गायब; उडाली एकच खळबळ, ट्रम्प, मस्क तपास करणार का?

अब्जावधी डॉलर्सचं सोनं अमेरिकेतून गायब झालंय का? अमेरिकेकडे खरंच सोनं नाही का? सोशल मीडियावर ही चर्चा वेगानं पसरत आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनीही यात एन्ट्री घेतली आहे. खरं तर अमेरिकेतील फोर्ट नॉक्समध्ये भरपूर सोनं आहे. येथे ४५८० टन सोने साठवलं असल्याचा अंदाज आहे. त्याची किंमत ४२५ अब्ज डॉलर (सुमारे ३७ लाख कोटी रुपये) इतकी आहे. मात्र, सरकारने त्याची किंमत ४२.२२ डॉलर प्रति औंस निश्चित केली आहे, जी बऱ्याच दिवसांपासून अपडेट करण्यात आलेली नाही. फोर्ट नॉक्स हे अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे जिथे अमेरिकेचं बहुतेक सोनं ठेवलं जातं. 

मस्क यांचा सरकारी कार्यक्षमता विभाग (डीओजीई) सरकारी खर्चात कपात करण्यात गुंतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना फोर्ट नॉक्समध्ये सांगितलं आहे तितकं सोनं आहे की नाही, अशी शंका आहे. मस्क आणि रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांचेही नाव या अफवांमध्ये आहे. मस्क फोर्ट नॉक्समध्ये जाऊन याचा तपास करू शकतात.

काय आहे प्रकरण?

"इलॉन मस्क यांनी फोर्ट नॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी ४५८० टन सोनं आहे की नाही हे पाहिलं तर बरं होईल. अखेरचं ५० वर्षांपूर्वी १९७४ मध्ये ते कोणी पाहिलं होतं," असं झिरोएज (Zerohedge) नावाच्या युझरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलंय.
"नक्कीच, कमीतकमी वर्षातून एकदा तरी तपास होतच असावा," असं मस्क म्हणाले. यावर केंटकीचे रिपब्लिकन सीनेटर रँड पॉल यांनीही मस्क यांच्या या पोस्टवर होकार दिल्याचा रिप्लाय दिला.

यापूर्वीही उपस्थित केलेला प्रश्न

फोर्ट नॉक्समध्ये यापूर्वी किती सोनं आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. रँड पॉल यांचे वडील रॉन पॉल हे टेक्सासचे रिपब्लिकन खासदार आणि तीन वेळा राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार होते. डॉलरला पुन्हा सोन्याशी जोडण्याचे त्यांनी समर्थन केलं.

फोर्ट नॉक्समध्ये सोन्याच्या अस्तित्वावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. २०११ मध्ये पॉल यांनी ब्लूमबर्ग बिझनेसवीकशी यासंदर्भात संवाद साधला. "सरकार अमेरिकन लोकांना सर्व सोनं आहे यावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे, परंतु कोणालाही आत जाऊ देत नाही आणि सर्व डेटा सार्वजनिक करत नाही. मात्र, ट्रेझरी इन्स्पेक्टर जनरल एरिक एम. थोरसन यांनी सर्व सोनं पाहिलं आणि मोजलं, असं म्हटलं होतं.

Web Title: 4580 tons of gold worth Rs 37 lakh crores disappeared from America will Trump Musk investigate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.