Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indo Farm IPO : २३० पट सबस्क्रिप्शन, तरीही 'या' IPO चं सुस्त लिस्टिंग; पाहा गुंतवणूकदारांना किती झाला नफा

Indo Farm IPO : २३० पट सबस्क्रिप्शन, तरीही 'या' IPO चं सुस्त लिस्टिंग; पाहा गुंतवणूकदारांना किती झाला नफा

Indo Farm IPO Listing Price: कंपनीच्या शेअरचं लिस्टिंग अपेक्षेप्रमाणे झाली नाही. बीएसईवर कंपनीचे शेअर्स सुमारे २० टक्के प्रीमियमसह २५८.४० रुपयांच्या भावावर लिस्ट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:25 IST2025-01-07T14:25:55+5:302025-01-07T14:25:55+5:30

Indo Farm IPO Listing Price: कंपनीच्या शेअरचं लिस्टिंग अपेक्षेप्रमाणे झाली नाही. बीएसईवर कंपनीचे शेअर्स सुमारे २० टक्के प्रीमियमसह २५८.४० रुपयांच्या भावावर लिस्ट झाले.

230 times subscription yet Indo Farm IPO Listing is sluggish See how much profit investors made | Indo Farm IPO : २३० पट सबस्क्रिप्शन, तरीही 'या' IPO चं सुस्त लिस्टिंग; पाहा गुंतवणूकदारांना किती झाला नफा

Indo Farm IPO : २३० पट सबस्क्रिप्शन, तरीही 'या' IPO चं सुस्त लिस्टिंग; पाहा गुंतवणूकदारांना किती झाला नफा

Indo Farm IPO Listing Price: ट्रॅक्टर आणि कृषी अवजारं बनवणारी कंपनी इंडो फार्म इक्विपमेंटची आज भारतीय शेअर बाजारात लिस्टिंग झालं. मात्र, लिस्टिंग अपेक्षेप्रमाणे झाली नाही. बीएसईवर कंपनीचे शेअर्स सुमारे २० टक्के प्रीमियमसह २५८.४० रुपयांच्या भावावर लिस्ट झाले. त्याचप्रमाणे एनएसईवर कंपनीचे शेअर्स १९.०७ टक्क्यांच्या प्रीमियमसह २५६.०० रुपयांच्या प्रीमियमवर लिस्ट झाले. मंगळवारी सकाळच्या सुमारास इंडो फार्मचा शेअर बीएसईवर इश्यू प्राइसपेक्षा ६७.७५ रुपयांनी (३१.५१%) वधारून २८२.७५ रुपयांवर व्यवहार करत होता.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09

२२९.६८ पट सबस्क्रिप्शन

३१ डिसेंबरला उघडलेला हा आयपीओ २ जानेवारीला बंद झाला. हा आयपीओ २२९.६८ पट सब्सक्राइब झाला होता. इंडो फार्मच्या आयपीओला मिळालेला दमदार सब्सक्रिप्शन पाहता कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रीमियमसह बाजारात लिस्ट होतील, अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही.

किती होता प्राईज बँड?

इंडो फार्मनं आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर २०४ ते २१५ रुपये प्राईज बँड निश्चित केला होता. या आयपीओमधून कंपनीनं एकूण २६०.१५ कोटी रुपये उभे केले आहेत. यासाठी इंडो फार्मनं एकूण १,२१,००,००० शेअर्स जारी केले. यामध्ये १८४.९० कोटी रुपयांचे ८६,००,००० नवीन शेअर्स आणि ओएफएसच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या ७५.२५ कोटी रुपयांच्या ३५,००,००० शेअर्सचा समावेश आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 230 times subscription yet Indo Farm IPO Listing is sluggish See how much profit investors made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.