एसएमई (SME) स्टॉक एक्साटो टेक्नॉलॉजीजमध्ये (Exato Technologies) जोरदार तेजी सुरू आहे. एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सना सातत्यानं अपर सर्किट लागत आहे. कंपनीचे शेअर्स सलग ५ दिवसांपासून अपर सर्किटवर आहेत. मंगळवारी, कंपनीचे शेअर्स बीएसईवर ५ टक्क्यांनी उसळी घेऊन ₹३९२.८५ वर पोहोचले. एक्साटो टेक्नॉलॉजीज ही शेअर बाजारात नुकतीच लिस्ट झालेली कंपनी आहे.
कंपनीचे शेअर्स ५ डिसेंबर रोजी बाजारात लिस्ट झाले. आयपीओमध्ये एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या शेअरचा भाव ₹१४० होता. आयपीओच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स अवघ्या ८ दिवसांत १८० टक्क्यांनी वाढले आहेत. या कंपनीमध्ये दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांचीही गुंतवणूक आहे.
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
केडिया यांच्याकडे ३ लाखांहून अधिक शेअर्स
दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी एक्साटो टेक्नॉलॉजीजमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. विजय केडिया यांच्याकडे एक्साटो टेक्नॉलॉजीजचे ३,५०,४३६ शेअर्स आहेत. कंपनीमध्ये विजय केडिया यांचा हिस्सा ३.४८ टक्के आहे. शेअरहोल्डिंगचा हा डेटा सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीपर्यंतचा आहे. एक्साटो टेक्नॉलॉजीजमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा ५४.७३ टक्के आहे, तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग ४५.२७ टक्के आहे. एसएमई कंपनी एक्साटो टेक्नॉलॉजीजचे बाजार भांडवल मंगळवारी ₹३९५ कोटींच्या पुढे गेलं.
पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट झाले होते. आयपीओमध्ये एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या शेअरचा भाव ₹१४० होता. कंपनीचे शेअर्स ५ डिसेंबर रोजी बीएसईवर ९० टक्क्यांच्या फायद्यासह ₹२६६ वर लिस्ट झाले. लिस्टिंगच्या त्याच दिवशी एक्साटो टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आणखी वाढून ₹२७९.३० वर पोहोचले. कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी ₹१४० च्या इश्यू प्राइसच्या तुलनेत १०० टक्क्यांनी वाढले. म्हणजेच, कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी लोकांचे पैसे दुप्पट केले. एक्साटो टेक्नॉलॉजीजचा आयपीओ २८ नोव्हेंबर २०२५ रोजी बोली लावण्यासाठी खुला झाला होता आणि तो २ डिसेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनीच्या आयपीओचा एकूण आकार ₹३७.४५ कोटींपर्यंत होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
