Lokmat Money > बिझनेस न्यूज > DA मध्ये पुन्हा एकदा 15 टक्क्यांची वाढ, सरकारनं या कर्मचऱ्यांना दिली आनंदाची बातमी!

DA मध्ये पुन्हा एकदा 15 टक्क्यांची वाढ, सरकारनं या कर्मचऱ्यांना दिली आनंदाची बातमी!

सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ऑक्टोबर महिन्यातच वाढ करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 21:43 IST2023-11-24T21:42:57+5:302023-11-24T21:43:36+5:30

सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ऑक्टोबर महिन्यातच वाढ करण्यात आली होती.

15 percent increase in DA once again, the government gave good news to these employees | DA मध्ये पुन्हा एकदा 15 टक्क्यांची वाढ, सरकारनं या कर्मचऱ्यांना दिली आनंदाची बातमी!

DA मध्ये पुन्हा एकदा 15 टक्क्यांची वाढ, सरकारनं या कर्मचऱ्यांना दिली आनंदाची बातमी!

पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे, पगार मिळवणाऱ्या काही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केली आहे. महत्वाचे म्हणजे, सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ऑक्टोबर महिन्यातच वाढ करण्यात आली होती.

किती वाढला DA - 
सहाव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (CPSEs) कर्मचार्‍यांसाठी, मूळ वेतनावर मिळणारा महागाई भत्ता 221% वरून 230% करण्यात आला आहे. अर्थात 9 टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यातील सुधारित दर 1 जुलै 2023 पासून लागू होईल. याच प्रमाणे, पाचव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. यात दोन कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

ज्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनासह डीएच्या 50% विलीनीकरणा मंजुरी देण्यात आलेली नाही. त्या कर्मचाऱ्यांचा डीए सध्याच्या 462% वरून 477% पर्यंत वाढविला जाऊ शकतो. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासह डीएच्या 50% विलिनीकरणाचा लाभ देण्यात आला आहे, अशा कर्मचाऱ्यांचा डीए 412% वरून 427% केला जाऊ शकतो. अशा प्रकारे त्यांच्या डीएमध्ये 15 टक्के वाढ होऊ शकते.

ऑक्टोबरमध्ये किती वाढला डीए -  
गेल्या ऑक्टोबर महिन्यात सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार, सॅलरी मिळवणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्ससाठी महागाई भत्ता 42% वरून 46% करण्यात आला आहे. हा दर 1 जुलै, 2023 पासून लागू आहे.
 

Web Title: 15 percent increase in DA once again, the government gave good news to these employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.