lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Alert! पुढील महिन्यापासून तुम्ही 'या' बँकांच्या चेकबुकमधून पेमेंट करू शकणार नाही

Alert! पुढील महिन्यापासून तुम्ही 'या' बँकांच्या चेकबुकमधून पेमेंट करू शकणार नाही

Bank Alert! नवीन चेकबुकसाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेत जावे लागेल. याशिवाय, बँकेचे ग्राहक चेकबुकसाठी ऑनलाईन अर्जही करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:20 PM2021-09-21T13:20:57+5:302021-09-21T13:22:59+5:30

Bank Alert! नवीन चेकबुकसाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेत जावे लागेल. याशिवाय, बँकेचे ग्राहक चेकबुकसाठी ऑनलाईन अर्जही करू शकतात.

from 1 october you will not be able to make payment from the cheque book of these banks check details | Alert! पुढील महिन्यापासून तुम्ही 'या' बँकांच्या चेकबुकमधून पेमेंट करू शकणार नाही

Alert! पुढील महिन्यापासून तुम्ही 'या' बँकांच्या चेकबुकमधून पेमेंट करू शकणार नाही

नवी दिल्ली : जर तुम्ही देखील बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे (UBI) जुने चेकबुक पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून अवैध होतील. म्हणजेच, पुढील महिन्यापासून तुम्ही जुन्या चेकबुकमधून  (cheque book) पेमेंट शकणार नाही. (from 1 october you will not be able to make payment from the cheque book of UBI, OBC)

दरम्यान, 1 ऑक्टोबर 2021 पासून ओरिएंटल बँक (Oriental bank), अलाहाबाद बँक (Allahabad Bank)आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची (United Bank of India) जुनी चेकबुक निरुपयोगी होतील. कारण, ओरिएंटल आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 रोजी पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) झाले आहे आणि आता ते प्रभावी झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेने ही माहिती दिली आहे.


1 ऑक्टोबरपासून बंद होणार जुने चेकबुक
ई-ओबीसी आणि ई-यूएनआयचे जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून चालणार नाही, असे पीएनबीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, ग्राहकांना सांगण्यात आले आहे की, ज्यांच्याकडे ओबीसी आणि यूएनआय बँकांचे जुने चेकबुक आहेत, त्यांनी लवकरच नवीन चेकबुक बदलून घ्यावे, अन्यथा जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून निरुपयोगी होतील. नवीन चेकबुक पीएनबीच्या अपडेटेड IFSC कोड आणि  MICR कोडसह येतील.

नवीन चेकबुकसाठी असा करा अर्ज
नवीन चेकबुकसाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेत जावे लागेल. याशिवाय, बँकेचे ग्राहक चेकबुकसाठी ऑनलाईन अर्जही करू शकतात. यासाठी तुम्ही इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे चेकबुकसाठी अर्ज करू शकता.


या नंबरवर करु शकता कॉल
जर ग्राहकाला चेकबुकच्या व्यवहारात कोणतीही अडचण येऊ नये असे वाटत असेल तर नवीन चेकबुक घेणे आवश्यक आहे. ग्राहक यासंदर्भात सविस्तर माहिती मिळवण्यासाठी 18001802222 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात.

Read in English

Web Title: from 1 october you will not be able to make payment from the cheque book of these banks check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.