Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ लाखाचे झाले ३३ कोटी, 'या' स्टॉकने ३३८,०००% रिटर्न देत करुन दिली छप्परफाड कमाई

१ लाखाचे झाले ३३ कोटी, 'या' स्टॉकने ३३८,०००% रिटर्न देत करुन दिली छप्परफाड कमाई

शेअर बाजारानं दीर्घकालावधीत अनेक गुंतवणूकदारांचे नशीब बदललं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 12:39 IST2023-12-30T12:39:03+5:302023-12-30T12:39:17+5:30

शेअर बाजारानं दीर्घकालावधीत अनेक गुंतवणूकदारांचे नशीब बदललं आहे.

1 Lakh investment become 33 Crores this stock made a record breaking return of 338000 percent Borosil Renewables Share huge return | १ लाखाचे झाले ३३ कोटी, 'या' स्टॉकने ३३८,०००% रिटर्न देत करुन दिली छप्परफाड कमाई

१ लाखाचे झाले ३३ कोटी, 'या' स्टॉकने ३३८,०००% रिटर्न देत करुन दिली छप्परफाड कमाई

Borosil Renewables Share: शेअर बाजारानं दीर्घकालावधीत अनेक गुंतवणूकदारांचे नशीब बदललं आहे. असाच एक स्टॉक बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेडचा (Borosil Renewables Share) आहे. ज्यामध्ये गेल्या काही वर्षांत 338,476.92 टक्के परतावा नोंदवला गेला. अशी एक वेळ होती जेव्हा या शेअरची किंमत फक्त 13 पैसे होती. ज्याची किंमत आता 400 च्या पुढे गेला आहे. ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना मोठा परतावा मिळाला आहे.

काय करते कंपनी?
ही मल्टीबॅगर कंपनी सोलार ग्लास बनवते. 7 नोव्हेंबर 2003 रोजी बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडचा (Borosil Renewables Share) स्टॉक 13 पैशांवर होता. जो आज 440.15 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअर्सनं गुंतवणूकदारांना 338,000% पेक्षा जास्त परतावा दिला.

1 लाखांचे झाले 33 कोटी
ज्या गुंतवणूकदारांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना आज 33.35 कोटी रुपयांपेक्षा अधिक परतावा मिळाला असता. बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट या रिटर्नमध्ये समाविष्ट करण्यात आले नाहीत. शॉर्ट टर्ममध्ये या शेअरनं गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिलाय. पण दीर्घकाळात गुंतवणूकदार श्रीमंत झाले.

3 वर्षात 1100 टक्क्यांचा रिटर्न
गेल्या तीन वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. 22 मे 2020 रोजी हा स्टॉक 34.55 रुपयांवर होता. या शेअरची किंमत 29 डिसेंबर 2023 रोजी 440.15 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत या शेअरनं गुंतवणूकदारांना 1155 टक्के परतावा दिला.

एका वर्षात निगेटिव्ह रिटर्न
एका वर्षाच्या कालावधीत, या शेअरनं गुंतवणूकदारांना 13.11 टक्के नकारात्मक परतावा दिला. एक वर्षापूर्वी 29 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 506.25 रुपये होती. जी आता 439.90 रुपयांवर आली आहे. सहा महिन्यांतही बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 1 Lakh investment become 33 Crores this stock made a record breaking return of 338000 percent Borosil Renewables Share huge return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.