जुलै २०२५ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये निधीचा इनफ्लो तब्बल ८१ टक्के वाढून ४२,७०२ कोटी रुपयांवर पोहोचला. हा सार्वकालिक उच्चांक आहे. यात सेक्टोरल, थीमॅटिक आणि फ्लेक्सी-कॅप फंडांचे योगदान सर्वाधिक आहे. डेब्ट म्युच्युअल फंडांमध्येही गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली असून, शुद्ध इनफ्लो १.०६ लाख कोटी रुपये इतका नोंदला गेला आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडांमधील निधी इनफ्लो जून २०२५ मध्ये २३,५८७कोटी रुपये, तर जुलै २०२४ मध्ये ३७,११३ कोटी रुपये होता. ११ उपप्रकारांमध्ये, सेक्टोरल व थीमॅटिक म्युच्युअल फंडांनी इनफ्लोमध्ये आघाडीवर राहून जुलैमध्ये ९,४२६ कोटींची गुंतवणूक आकर्षित केली. दुसऱ्या क्रमांकाच्या फ्लेक्सी-कॅप फंडांनी ७,६५४ कोटींची गुंतवणूक मिळविली.
सेक्टोरल व थीमॅटिक फंडांत जूनमधील ४७५ कोटींच्या तुलनेत १,८८२ टक्के मासिक वाढ नोंदवली आहे. डिव्हिडंड यील्ड फंडांनीही ११२ टक्के वाढ नोंदवली. मात्र, ती बरीच लहान बेसवर होती.
अन्य म्युच्युअल फंडांची कशी?
स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड आणि मीड-कॅप म्युच्युअल फंड यांनी जुलै महिन्यात अनुक्रमे ६,४८४ कोटी रुपये आणि ५,१८२ कोटी रुपये गुंतवणूक मिळवली. या फंडांतील मासिक वाढ अनुक्रमे ६१ टक्के व ३८ टक्के राहिली. डिव्हिडंड यील्ड फंडांचा निधी २ इनफ्लो जुलैमध्ये सर्वांत कमी २६.६५ कोटी रुपये नोंदवला गेला.
म्युच्युअल फंडांच्या ११ श्रेणींपैकी फक्त ईएलएसएस फंडांत निधी आउटफ्लो नोंदवला गेला. यात जुलैमध्ये ३६८ कोटी रुपये बाहेर गेले. जूनमधील ५५६ कोटी रुपयांच्या आऊटफ्लोपेक्षा तो कमी आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)