Best Mutual Funds : गेल्या काही वर्षांत, शेअर बाजारातील चढ-उतारांमध्येही काही इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांची चांगली कमाई करून दिली आहे. विशेषतः, ज्यांनी एकरकमी मोठी गुंतवणूक न करता, दर महिन्याला थोडी थोडी रक्कम सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवली, त्यांना तर अनेक फंडांनी उत्तम परतावा दिला आहे. आम्ही अशाच ७ इक्विटी फंडांची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांनी गेल्या ५ वर्षांत SIP गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा दिला आहे.
या ७ फंडांनी SIP तून गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट!
आम्ही येथे ज्या ७ इक्विटी फंडांबद्दल बोलत आहोत, त्यांनी एसआयपीच्या माध्यमातून वार्षिक ३० ते ३२% इतका दमदार परतावा दिला आहे. यामुळे, ५ वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट किंवा त्याहूनही अधिक झाले आहेत! विशेष म्हणजे, या सर्व फंडांना ४ किंवा ५ स्टार रेटिंग मिळाले आहे, जे त्यांची मजबूत कामगिरी दर्शवते.
खाली दिलेले आकडे हे १०,००० रुपयांच्या मासिक SIP चे ५ वर्षांतील मूल्य आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड - डायरेक्ट प्लॅन
- SIP वर ५ वर्षांचा वार्षिक परतावा: ३२.८६%
- ६ लाख एकूण गुंतवणुकीचे मूल्य: १३,१६,०६४ रुपये
- १ लाखाच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ५,००,९७० रुपये
- खर्चाचे प्रमाण : १.१४%
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड - डायरेक्ट प्लॅन
- SIP वर ५ वर्षांचा वार्षिक परतावा: ३२.३१%
- ६ लाख एकूण गुंतवणुकीचे मूल्य: १२,९९,६४८ रुपये
- १ लाखाच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ४,९०,४३१ रुपये
- खर्चाचे प्रमाण : ०.६८%
बंधन स्मॉल कॅप फंड - डायरेक्ट प्लॅन
- SIP वर ५ वर्षांचा वार्षिक परतावा: ३१.४८%
- ६ लाख एकूण गुंतवणुकीचे मूल्य: १२,७४,९८६ रुपये
- १ लाखाच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ५,०१,१३९ रुपये
- खर्चाचे प्रमाण : ०.३९%
एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्चर फंड - डायरेक्ट प्लॅन
- SIP वर ५ वर्षांचा वार्षिक परतावा: ३१.३३%
- ६ लाख एकूण गुंतवणुकीचे मूल्य: १२,७०,७०५ रुपये
- १ लाखाच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ४,३६,३८० रुपये
- खर्चाचे प्रमाण : ०.५०%
फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंड - डायरेक्ट प्लॅन
- SIP वर ५ वर्षांचा वार्षिक परतावा: ३०.२२%
- ६ लाख एकूण गुंतवणुकीचे मूल्य: १२,३८,५०४ रुपये
- १ लाखाच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ४,४४,४६८ रुपये
- खर्चाचे प्रमाण : ०.९५%
कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंड - डायरेक्ट प्लॅन
- SIP वर ५ वर्षांचा वार्षिक परतावा: ३०.०४%
- ६ लाख एकूण गुंतवणुकीचे मूल्य: १२,३३,२९४ रुपये
- १ लाखाच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ४,३७,८९२ रुपये
- खर्चाचे प्रमाण : ०.९८%
निप्पॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रा फंड - डायरेक्ट प्लॅन
- SIP वर ५ वर्षांचा वार्षिक परतावा: ३०.०४%
- ६ लाख एकूण गुंतवणुकीचे मूल्य: १२,३२,८०१ रुपये
- १ लाखाच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ४,२२,९६९ रुपये
- खर्चाचे प्रमाण : ०.९४%
वाचा - बाटलीने नव्हे, शेअरने चढली नशा! १० रुपयांच्या स्टॉकचा मल्टीबॅगर परतावा, गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
टीप : हा लेख केवळ माहिती देण्यासाठी आहे. यात कोणत्याही प्रकारची गुंतवणुकीची शिफारस केली नाही. गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.