Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >म्युच्युअल फंड > टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?

टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Mutual Fund Negative Returns : गेल्या वर्षभरात टेक म्युच्युअल फंडांनी नकारात्मक परतावा दिला आहे. कोणत्या फंडांनी सर्वात जास्त नुकसान केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:30 IST2025-11-03T15:05:05+5:302025-11-03T15:30:39+5:30

Mutual Fund Negative Returns : गेल्या वर्षभरात टेक म्युच्युअल फंडांनी नकारात्मक परतावा दिला आहे. कोणत्या फंडांनी सर्वात जास्त नुकसान केले?

Tech Mutual Funds See Negative Returns in 1 Year What Should Investors Do Now? | टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?

टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Mutual Fund Negative Returns : गेल्या एका वर्षात जागतिक आर्थिक धोरणे आणि भू-राजकीय तणावामुळे देशातील टेक्नॉलॉजी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सेक्टोरल म्युच्युअल फंड्सवर झाला असून, अनेक फंडांचा एका वर्षाचा सरासरी परतावा निगेटिव्ह (-५.०८%) राहिला आहे. काही फंड्सचा परतावा तर मायनस (-) १०% च्या आसपास आहे. त्यामुळे या फंड्समध्ये पैसे लावलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी आता काय पाऊल उचलावे, याबद्दल सविस्तर माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला पाहूया.

सर्वाधिक तोटा झालेले फंड्स
टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या टेक इक्विटी फंड्सचा एका वर्षाचा सरासरी श्रेणी परतावा -५.०८% आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या २८ स्कीम्सपैकी फक्त ७ स्कीम्सनीच पॉझिटिव्ह परतावा दिला आहे.

टेक्नॉलॉजी फंड (योजना) एका वर्षाचा परतावा 
ॲक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड (-) ९.८८ % 
बंधन निफ्टी आयटी इंडेक्स फंड (-) ९.८७ % 
क्वांट टेक फंड (-) ९.८२ % 
आयसीआयसीआय प्रु निफ्टी आयटी इंडेक्स फंड (-) ९.७७ % 
निप्पॉन इंडिया निफ्टी आयटी इंडेक्स फंड ९.७४ % 

घाई करू नका! दीर्घकालीन आकडेवारी पाहा
टेक फंड्सचा हा निगेटिव्ह परतावा पाहून अनेक गुंतवणूकदार अस्वस्थ झाले असतील. पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी नेहमीप्रमाणे दीर्घकालीन कामगिरीचे आकडे पाहणे आवश्यक आहे.

आयटी सेक्टर फंड्सचा ३ वर्षे, ५ वर्षे आणि १० वर्षांचा सरासरी परतावा पाहिल्यास चित्र पूर्णपणे बदलते.

३ वर्षे१३.३० %
५ वर्षे१६.९४ %
१० वर्षे१६.६६ %


दीर्घकाळात या फंड्सनी १३% ते १७% पर्यंत मजबूत परतावा दिला आहे, जो हे सिद्ध करतो की सेक्टोरल फंड्समध्ये शॉर्ट टर्म व्होलॅटिलिटी सामान्य आहे.

तोट्यात गेलेल्या फंड्सचीही दीर्घकालीन कामगिरी चांगली
| फंड (योजना) | २ वर्षांचा परतावा | ३ वर्षांचा परतावा |
| ॲक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड | ९.९७ % | - |
| बंधन निफ्टी आयटी इंडेक्स फंड | १०.६२ % | - |
| क्वांट टेक फंड | ११.८५ % | - |
| आयसीआयसीआय प्रु निफ्टी आयटी इंडेक्स फंड | ९.९८ % | ९.२९ % |

फंड (योजना) २ वर्षांचा परतावा ३ वर्षांचा परतावा 
ॲक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड ९.९७ % -
बंधन निफ्टी आयटी इंडेक्स फंड १०.६२ % -
क्वांट टेक फंड ११.८५ % -
आयसीआयसीआय प्रु निफ्टी आयटी इंडेक्स फंड ९.९८ % ९.२९ % 

गुंतवणूकदारांनी आता काय करावे? 

  • शेअर बाजार तज्ज्ञ सांगतात की, म्युचूअल फंड्सच्या गुंतवणुकीबद्दल नेहमी जे सांगितले जाते, त्याच नियमांचे पालन करणे येथे महत्त्वाचे आहे. इक्विटी फंड्समधील गुंतवणूक नेहमी दीर्घ मुदतीसाठी ठेवावी.
  • टेक्नॉलॉजी फंड्स हे सेक्टोरल फंड्स आहेत. याचा अर्थ ते अत्यंत उच्च जोखीम आणि शॉर्ट टर्म व्होलॅटिलिटीसाठी ओळखले जातात.
  • जर तुम्ही या सर्व बाबी विचारात घेऊनच गुंतवणूक केली असेल, तर सध्याच्या घसरणीमुळे घाबरून जाऊन विक्री करू नका. थोडा वेळ वाट पाहणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.

सेक्टरल फंड्सची जोखीम समजून घ्या
फ्लेक्सी कॅप किंवा मल्टी कॅप सारख्या विविधतेवर आधारित फंड्सच्या तुलनेत सेक्टोरल फंड्समध्ये चढ-उताराची शक्यता जास्त असते, कारण ते एकाच उद्योगावर अवलंबून असतात.
जर तुमचा दृष्टिकोन ५ ते १० वर्षांचा असेल, तर या फंड्सची मूळ क्षमता लक्षात घेऊन गुंतवणूक कायम ठेवावी.

SIP सुरू ठेवा
जर तुम्ही एसआयपी करत असाल, तर किंमत सरासरीच्या दृष्टीने ही घसरण एक चांगली संधी ठरू शकते. तुमच्या गुंतवणुकीवर विश्वास असल्यास, एसआयपी सुरू ठेवणे फायद्याचे ठरेल.

वाचा - टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : टेक फंड्स ने दिया नकारात्मक रिटर्न! निवेशकों को क्या करना चाहिए?

Web Summary : वैश्विक कारकों से प्रौद्योगिकी क्षेत्र के म्यूचुअल फंड को नुकसान हुआ। हाल के नकारात्मक रिटर्न के बावजूद, विशेषज्ञ निवेशकों को लंबी अवधि के प्रदर्शन पर विचार करने और एसआईपी जारी रखने की सलाह देते हैं, सेक्टोरल फंड जोखिमों को समझते हैं। घबराओ मत, निवेशित रहो।

Web Title : Tech Funds Give Negative Returns! What Should Investors Do?

Web Summary : Technology sector mutual funds faced losses due to global factors. Despite recent negative returns, experts advise investors to consider long-term performance and continue SIPs, understanding sectoral fund risks. Don't panic, stay invested.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.