Lokmat Money >म्युच्युअल फंड > अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना...

अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना...

लहान गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 19:37 IST2025-03-22T19:36:33+5:302025-03-22T19:37:13+5:30

लहान गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी.

Start SIP from just Rs 250; Kotak has brought this special investment plan | अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना...

अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना...

SIP: तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (KMAMC) ने 'स्मॉल SIP' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हे कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाच्या सर्व पात्र योजनांसाठी उपलब्ध असेल. याद्वारे कोटक म्युच्युअल फंडाचे उद्दिष्ट भारतीय गुंतवणूकदारांना सुलभ गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आहे. SEBI आणि AMFI यांनी अलीकडेच स्मॉल तिकीट SIP सुरू केल्यामुळे हा उपक्रम आणखी महत्त्वाचा बनला आहे.

काय म्हणाले एमडी?
कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह म्हणाले, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 5.4 कोटी लोकच म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे देशात म्युच्युअल फंडाच्या विस्ताराची प्रचंड क्षमता आहे.

250 रुपये गुंतवणूक
स्मॉल एसआयपी अंतर्गत कोणताही नवीन गुंतवणूकदार किमान फक्त ₹250 ची गुंतवणूक सुरू करू शकतो. हा उपक्रम लहान भारतीय गुंतवणूकदारांसाठी वरदान ठरू शकतो. आता गुंतवणूकदार मोठ्या रकमेच्या गरजेशिवाय स्वप्ने साकार करण्यासाठी गुंतवणूक करू शकतात. कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड कोणत्याही परताव्याची/भविष्यातील परताव्याची हमी किंवा वचन देत नाही.

किमान गुंतवणूक रक्कम: 250 रुपये प्रति महिना
पात्रता: प्रथमच म्युच्युअल फंड गुंतवणूकदार
इनव्हेस्टमेंट मोड: ग्रोथ ऑप्शन
कमिटमेंट: किमान 60 EMI
पेमेंट पर्याय: फक्त NACH किंवा UPI ऑटो-पे

SBI ची योजना फेब्रुवारीमध्ये सुरू झाली
यापूर्वी SBI म्युच्युअल फंडाने फेब्रुवारी महिन्यात 250 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीसह SIP सुरू केली होती. SBI Yono ॲप व्यतिरिक्त ही गुंतवणूक पेटीएम, झेरोधा आणि ग्रोव इत्यादी वित्तीय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. खेडे, शहरे आणि शहरी भागातील लहान बचतकर्ता आणि प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांना आर्थिक समावेशाच्या कक्षेत आणण्यासाठी ही खास योजना तयार केली आहे.

(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Start SIP from just Rs 250; Kotak has brought this special investment plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.