SIP Investment: शेअर बाजारातील अस्थिरतेदरम्यान एसआयपीबाबत मोठी आकडेवारी समोर आली आहे. एएमएफआयच्या अहवालानुसार मार्च महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात (Mutual Funds) एकूण २५,९२६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. गेल्या चार महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. मात्र, चांगली बाब म्हणजे शेअर बाजारात पुन्हा एकदा सुधारणा दिसून येत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांहून अधिक वधारून बंद झाले.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात २५,९९९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. हा असा काळ होता जेव्हा शेअर बाजारात मोठी विक्री झाली होती. सध्या शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण दिसून येत आहे.
बँकांनी व्याजदर कमी केल्यानंतर FD पेक्षा बेस्ट ठरतेय पोस्टाची 'ही' स्कीम, मिळतंय अधिक व्याज
५१ लाख खाती बंद
एएमएफआयच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात ५१ लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली आहेत. तर ४० लाख नवीन एसआयपी खाती उघडण्यात आलीत. यावरून गेल्या वर्षभरात एसआयपी स्टॉपेज अकाऊंट रेशो वाढल्याचे दिसून येतंय. फेब्रुवारी महिन्यात एसआयपीओ स्टॉपेज रेशो १२२ टक्के होता. मार्च महिन्यात तो १२८.७५ टक्क्यांवर पोहोचला. यावरून जुने एसआयपीओ एकतर बंद पडत आहेत किंवा संपत चालले असल्याचं समजतं. त्या तुलनेत नवीन एसआयपी तुलनेनं कमी उघडत आहेत.
मार्चमध्ये एसआयपी खाती ८.११ कोटींवर
एएमएफआयच्या आकडेवारीनुसार ८.११ कोटी एसआयपी खाती होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हा आकडा ८.२६ कोटी होता. जानेवारीत ८.३४ कोटी एसआयपी खाती होती. मार्च २०२५ पर्यंत एसआयपीच्या माध्यमातून एकूण १३.३५ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन केलं जात होतं.
गेल्या काही वर्षांत एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये एसआयपीमध्ये ८,५१३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर फेब्रुवारी २०२५ मध्ये हा आकडा २६,००० कोटी रुपयांवर पोहोचला.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)