Lokmat Money >म्युच्युअल फंड > तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या

तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या

sip mutual funds : गेल्या काही वर्षांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. या गुंतवणूक पर्यायाद्वारे, एक सामान्य माणूस देखील श्रीमंत होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:29 IST2025-04-16T13:28:32+5:302025-04-16T13:29:06+5:30

sip mutual funds : गेल्या काही वर्षांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. या गुंतवणूक पर्यायाद्वारे, एक सामान्य माणूस देखील श्रीमंत होऊ शकतो.

sip mutual funds 10 secret tips that will make you millionaire | तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या

तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या

sip mutual funds : आपल्या मनासारखं जगावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. त्यासाठी योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि काही ठोस पाऊले उचलणे आवश्यक आहे. जसे की गुंतवणूक. अलीकडच्या काळात म्युच्युअल फंड किंवा एसआयपी हे शब्द तुमच्या कानावर नक्कीच पडले असतील. म्युच्युअल फंडांच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमचं आर्थिक ध्येय नक्कीच गाठू शकता. जर तुम्हीही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणूक सुरू करणार असाल तर तुम्हाला याचे सीक्रेट माहिती पाहिजेत. ज्यांच्या मदतीने सामान्य माणूसही श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.

वेळेची जादू
एसआयपी सुरू करताना मनात एक पक्क करा की 'कालावधी' गेम चेंजर आहे. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितके जास्त परतावा तुम्हाला मिळेल. एसआयपीमध्ये चक्रवाढीचा (कंपाउंडिंग) फायदा मिळतो. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी दरमहा ५००० रुपयांचा एसआयपी सुरू केली तर ६० व्या वर्षापर्यंत तुम्हाला गुंतवणुकीवर १२% वार्षिक परतावा मिळाला तर तुमच्याकडे एकूण ४.७ कोटी रुपये निधी असेल. पण जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर ही रक्कम फक्त १.४ कोटी रुपये होईल.

दीर्घकालीन गुंतवणुकीत खरी मजा
जर तुम्हाला एसआयपीचा खरा फायदा मिळवायचा असेल तर दीर्घकालीन गुंतवणूक निवडा. तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी किमान १० ते १५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ठेवा. कारण त्यामुळे बाजारातील अस्थिरतेचा समतोल साधणे सोपे होते.

योग्य म्युच्युअल फंड निवडा
गुंतवणुकीसाठी योग्य फंड निवडणे खूप महत्वाचे आहे. कारण तुमच्या फंडाची कामगिरी तुमचे परतावे ठरवते. फंड निवडण्यापूर्वी, गेल्या ५ ते १० वर्षांचा परतावा नक्की पहा. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही अनुभवी फंड मॅनेजर असलेला फंड देखील निवडू शकता.

एसआयपीमध्ये सातत्य
तुम्ही थोड्या रकमेपासून एसआयपी सुरू करू शकता. परंतु, नियमितपणे गुंतवणूक करत राहा. दरमहा फक्त ५०० रुपये गुंतवून तुम्ही एक मोठा निधी तयार करू शकता.

काळाबरोबर गुंतवणूक वाढवा
तुमच्या उत्पन्नानुसार एसआयपीची रक्कम ठरवा आणि तुमचे उत्पन्न वाढत असताना, गुंतवणुकीची रक्कम देखील वाढवता येते. दरवर्षी तुमची एसआयपी रक्कम १०-२०% ने वाढवण्याचा प्रयत्न करा.

रुपयाच्या सरासरी किमतीचा फायदा घ्या
एसआयपीद्वारे तुम्ही बाजारातील चढउतारांचा फायदा घेऊ शकता. जेव्हा जेव्हा बाजार खाली जातो तेव्हा तुम्हाला अधिक युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार वर जातो तेव्हा युनिट्सचे मूल्य वाढते.  त्यामुळे बाजार घसरला तरी आपली नियमित गुंतवणूक सुरू ठेवावी.

गुंतवणुकीत वैविध्य
कधीही एकाच फंडात किंवा एकाच क्षेत्रात गुंतवणूक करू नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांचे गुंतवणूक पर्याय असू शकतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लार्ज कॅप फंडमध्ये ६०%, मिड कॅपमध्ये ३०% आणि स्मॉल कॅप फंडमध्ये १०% गुंतवणूक करून जोखीम कमी करू शकता.

पोर्टफोलिओचा आढावा
तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचे वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे. दर ६ ते १२ महिन्यांनी तुमच्या फंडाची कामगिरी तपासत रहा. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या फंडाची कामगिरी तुमच्या बेंचमार्कपेक्षा कमी आहे, तर तुम्ही ते बदलू शकता. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत देखील घेऊ शकता.

कर लाभांचा वापर
काही एसआयपी कर बचत देखील देतात, ज्यामुळे तुमचे एकूण परतावे वाढू शकतात. जसे की ELSS फंड.

वाचा - धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमुळे एलआयसी मालामाल! १००० कोटी रुपयांचा नफा कसा कमावला?

आर्थिक शिस्त आणि संयम आवश्यक
गुंतवणुकीद्वारे कोणत्याही प्रकारचा मोठा निधी मिळविण्यासाठी, शिस्त आणि संयम असणे आवश्यक आहे. तुमचा खर्च कमी करुन गुंतवणूक वाढवा.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
 

Web Title: sip mutual funds 10 secret tips that will make you millionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.