Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >म्युच्युअल फंड > 'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?

'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?

SIP News : डिसेंबरमध्ये एसआयपी मधील गुंतवणूक मजबूत राहिली आणि विक्रमी उच्चांक गाठला. त्याचवेळी, स्टॉपेज रेशोमध्येही वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:06 IST2026-01-09T15:48:35+5:302026-01-09T16:06:50+5:30

SIP News : डिसेंबरमध्ये एसआयपी मधील गुंतवणूक मजबूत राहिली आणि विक्रमी उच्चांक गाठला. त्याचवेळी, स्टॉपेज रेशोमध्येही वाढ झाली.

SIP Inflow Hits Record ₹31,002 Crore in December, But Stoppage Ratio Rises to 85% | 'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?

'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?

Mutual Fund : भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणातही किरकोळ गुंतवणूकदारांनी 'सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' अर्थात एसआयपी वर आपला विश्वास कायम ठेवल्याचे दिसते. डिसेंबर महिन्यात मासिक एसआईपी गुंतवणुकीने ३१,००२ कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. मात्र, याच काळात एसआयपी बंद करण्याचे प्रमाणही वाढल्याने तज्ज्ञांनी सावध पवित्रा घेतला आहे.

गुंतवणुकीचे 'रेकॉर्ड' ब्रेक आकडे
डिसेंबर महिन्यातील एसआयपीची आकडेवारी पाहता, भारतीय गुंतवणूकदार शिस्तबद्ध गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते. नोव्हेंबरमधील २९,४४५ कोटींवरून डिसेंबरमध्ये ३१,००२ कोटींवर पोहोचली. एकूण एसआयपी मालमत्ता आता १६.६३ लाख कोटींवर गेली आहे, जी म्यॅुच्युअल फंड उद्योगाच्या एकूण मालमत्तेच्या २०.७% आहे. डिसेंबरमध्ये ६०.४६ लाख नवीन एसआयपी नोंदवण्यात आल्या असून एकूण खात्यांची संख्या ९.७९ कोटींवर पोहोचली आहे.

'स्टॉपेज रेशो'चा धोक्याचा इशारा?

  • एकीकडे नवीन गुंतवणूक वाढत असताना दुसरीकडे एसआयपी बंद करण्याचे प्रमाण वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये 'स्टॉपेज रेशो' ७५.६६% होता, तो डिसेंबरमध्ये थेट ८५% वर गेला आहे.
  • डिसेंबरमध्ये सुमारे ५१.५७ लाख एसआयपी एकतर बंद झाल्या किंवा त्यांची मुदत संपली (मॅच्युअर). एएमएफआय नुसार, ३३ लाख एसआयपी गुंतवणूकदारांनी स्वतःहून बंद केल्या आहेत.
  • स्टॉपेज रेशो १००% च्या जवळ जाणे याचा अर्थ असा की, नवीन एसआयपी सुरू होण्याच्या वेगाशी जुन्या एसआयपी बंद होण्याचा वेग स्पर्धा करत आहे. वाढत्या महागाईमुळे किंवा नफेखोरीसाठी गुंतवणूकदार एसआयपी थांबवत असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सोन्यातील गुंतवणूक तेजीत
डिसेंबर महिन्यात सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा कमालीचा वाढला आहे. नोव्हेंबरमधील ३,७४२ कोटींच्या तुलनेत डिसेंबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये ११,६४७ कोटींची प्रचंड गुंतवणूक झाली आहे. शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित पर्याय मानत आहेत.

वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी

म्यॅुच्युअल फंड उद्योगाची एकूण स्थिती

  • इक्विटी फंड : इक्विटीमधील गुंतवणूक मासिक आधारावर ६% ने घटून २८,०५४ कोटींवर आली आहे.
  • डेब्ट फंड : डेट म्यॅुच्युअल फंडातून १.३२ लाख कोटींची मोठी रक्कम काढून घेण्यात आली.
  • एकूण AUM : नोव्हेंबरमधील ८०.७ लाख कोटींवरून एकूण मालमत्ता थोडी घसरून ८०.२३ लाख कोटींवर आली आहे.
     

Web Title : बढ़ता 'स्टॉपेज रेशियो': म्यूचुअल फंड से निकासी, चिंता का विषय।

Web Summary : एसआईपी निवेश रिकॉर्ड ऊंचाई पर, लेकिन बढ़ता 'स्टॉपेज रेशियो' चिंता का संकेत है। निवेशक म्यूचुअल फंड से निकल रहे हैं, संभवतः मुद्रास्फीति या मुनाफावसूली के कारण, जबकि बाजार की अनिश्चितता के बीच सोने के निवेश में वृद्धि हुई है। इक्विटी और ऋण फंडों से निकासी देखी गई।

Web Title : Rising 'Stoppage Ratio' Causes Concern: Mutual Fund Exits Explained.

Web Summary : SIP investments hit a record high, but rising 'stoppage ratio' signals concern. Investors are pulling out of mutual funds, possibly due to inflation or profit-booking, while gold investments surge amidst market uncertainty. Equity and debt funds see outflows.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.